Police 
पुणे

Bharat Bandh: पुणे पोलिसांनी कसली कंबर; आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी 20 ठिकाणी चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.8) पुकारलेल्या 'भारत बंद' आंदोलनामध्ये पुण्यातही मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत. मात्र हे आंदोलन शांततेत व्हावे, त्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिस आंदोलनकर्त्यांशी समन्वय ठेवून आहेत, असे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. शहरात 20 ठिकाणी आंदोलन होण्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने पोलिस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

संसदेत संमत झालेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाना या राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घालत आंदोलन केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात शेतकरी संघटना, शहरातील विविध पक्ष, विविध प्रकारच्या सामाजिक, स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी मंगळवारी संपूर्ण शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

याविषयी डॉ.शिसवे म्हणाले, "आंदोलनकर्ते पक्ष आणि संघटनांशी आमचे बोलणे सुरूच आहे. त्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. शहरात होणाऱ्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिस आंदोलनकर्त्यांशी समन्वय ठेवून आहेत. पोलिस उपायुक्तांमार्फत विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'' 

शहरामध्ये मंगळवारी आंदोलन होण्याची शक्‍यता आहे, अशी 20 ठिकाणांची नावे पोलिसांना मिळाली आहे. त्या सर्व ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही. याची पुरेपूर काळजी घेतली आहे. चोख बंदोबस्त ठेवून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे डॉ.शिसवे यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT