Cold 
पुणे

पुणेकरांच्या अंगावर पुन्हा स्वेटर; गारठा कायम

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात हवेतील गारठा कायम आहे. आकाश निरभ्र असल्याने पुढील तीन ते चार दिवस हा गारठा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. पुण्यात रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात सर्वांत नीचांकी किमान तापमान नाशिक येथे १० अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

राज्यात हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस कमीअधिक स्वरूपात थंडी राहणार आहे. उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट असल्यामुळे राज्याच्या काही भागांत थंडी वाढली आहे. दिवसभर ऊन पडत असले तरी दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे हा चटकाही ऊबदार वाटत आहे. सायंकाळी काही प्रमाणात थंडी कमी असली तरी मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. पहाटे किमान तापमानाचा पारा घसरून दहा अंश सेल्सिअसच्या खाली येत आहे. राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राज्यातील पुणे, जळगाव, नगर, नाशिक, निफाड, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया या भागात किमान तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी त्याहून कमी आहे. 

कोल्हापूर, सातारा, सांगलीत थंडी कमी
कोकणात थंडी कमी-जास्त होत असल्याने किमान तापमान १५ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर अलिबागमध्ये किमान तापमानाचा पारा १५.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी कायम असल्याने किमान तापमान जवळपास सरासरीएवढे आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात थंडी किंचित कमी आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले आहे.

मराठवाड्यात थंडी काही प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे किमान तापमान १० ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातील अनेक भागात थंडी कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा अजूनही चांगलाच घसरलेला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

Uttar Pradesh: UP ATS चा धडाका! देवबंदमध्ये मोठी कारवाई; संशयास्पद व्हिडिओ आणि इराण-पाकिस्तान कनेक्शनची चर्चा

Premium|Artificial Intelligence Investment : एआय गुंतवणुकीतून आयटी क्षेत्राला धक्का; भारतीय कंपन्यांसमोर आव्हान

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

SCROLL FOR NEXT