पुणे

वकिलांसह पक्षकारही हाजीरऽऽ

सकाळवृत्तसेवा

पुणे, - न्यायालयीन कामकाज मर्यादित प्रमाणात सुरू ठेवल्याचा आम्हाला व पक्षकारांना मोठा फटका बसला आहे. मात्र, नियमित काम सुरू झाल्याने प्रलंबित खटल्यांवर सुनावणी होत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षकारांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व कामकाज व्यवस्थितपणे सुरू होईल, असा विश्‍वास ॲड. पुष्कर दुर्गे यांनी व्यक्त केला.

सोमवार (ता. ११) पासून येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू झाले आहे. त्यामुळे न्यायालयात येणारे पक्षकार आणि वकिलांची संख्या सध्या वाढली आहे. तर न्यायिक कामाची वेळ वाढल्याने सुनावणीला बूस्टर मिळाला आहे. या निर्णयाने पक्षकार आणि वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वकिलांनी आपल्या पक्षकारांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायालयात केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामुळे सर्वच प्रकरणांच्या तारखा नसल्याने वकिलांना मोठा वेळ मिळाला. त्याचा उपयोग कायद्याचा अभ्यास करण्यासाठी केल्याची माहिती वकिलांनी दिली.

न्यायालयात नियमित येण्यास सुरुवात  
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सीनिअर वकील प्रत्यक्ष न्यायालयात जाऊन काम करणे टाळत होते. त्यासाठी ते त्यांचे ज्युनिअर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करीत. मात्र, आता त्यांनी देखील नियमितपणे न्यायालयात येण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाविषयक खबरदारीबाबत सर्व उपाययोजना पुणे बार असोसिएशनकडून न्यायालय परिसरात राबविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT