Crime
Crime Sakal
पुणे

बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण करून नुकसान करणाऱ्या तिघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काळेबोराटेनगर येथे १२ जानेवारी २०२२ रोजी ही घटना घडली. (Pune Crime News)

मुईनुद्दीन खान (वय ४२, रा. बोराटेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे फिर्यादी केटरिंगचे काम करत होते. त्यावेळी आरोपीने साथीदाराच्या मदतीने बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून धमकी देत शिवीगाळ करीत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण केली.

दुकानातील टाईल्स फोडून नुकसान केले, सळई हवेत फिरवून आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : 'अब 400 पार'ला लागले ग्रहण! अजूनही भाजप बहुमतापासून दूर, इंडियाकडे काय आहे कल?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Akola Lok Sabha 2024 Election: अकोल्यात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर, भाजपलाही धक्का

Satara Lok Sabha Result: साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंना दिला दणका! ८६ हजार मतांनी आघाडीवर...

SCROLL FOR NEXT