Crime News sakal
पुणे

Pune News : मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील नऊ जणांना अटक

एकोणतीस मोटार सायकली जप्त

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : पुणे ग्रामीण, अहमदनगर व ठाणे ग्रामीण जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.

या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १० लाख रुपये किमतीच्या एकोणतीस मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.अशी माहिती पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

या प्रकरणी अमोल नवनाथ मधे (राहणार वाघवाडी पोखरी ता.पारनेर) , विजय संजय मधे (रा. निमदरी ता. पारनेर ), संतोष उमेश मधे (रा. केळेवाडी पोखरी पवळदरा ता. पारनेर ), संदिप सुभाष मधे (रा. केळेवाडी, कातळमाळ ता.संगमनेर ), विकास साहेबराव मधे (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता. पारनेर ), विजय विठ्ठल जाधव

(रा. कुरकुंडी ता संगमनेर), सुनील वामन मेंगाळ (रा. धरणमळई वाडी बोटा ता संगमनेर), भारत पोपट मेंगाळ (रा. गारोळे पठार ता. संगमनेर ), मयुर गंगाराम मेंगाळ (रा.आंबीदुमाला ता. संगमनेर ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.या पैकी पाच आरोपींना नारायणगाव, चार आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. ही बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. मोटारसायकल चोरांचा छडा लावण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती.

त्यानुसार तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार, हवालदार दिपक साबळे, नाईक संदिप वारे, जवान अक्षय नवले या पथकाला मोटार सायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली होती. दोन्ही तपास पथकाने संयुक्त कारवाई करत नगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन प्रमुखांसह नऊ जणांना जांबुत फाटा परीसरातून ताब्यात घेतले होते.

पुढील तपासात आरोपींकडून नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार,घोडेगाव पाच, ओतूर तीन , जुन्नर तीन, मंचर ,खेड , अकोले हद्दीतील प्रत्येकी दोन, रांजणगाव ,शिरूर, आश्वी, लोणी, टोकावडे हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण सव्वीस गुन्हे उघडकीस आले.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक निरिक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक उपनिरीक्षक तुषार पंदारे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, नाईक संदिप वारे, जवान अक्षय नवले, सहाय्यक उपनिरीक्षक मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दिली अनोखी भेट

Marathwada Mukti Sangram Din : ..अन् मराठवाडा भारतात विलीन झाला! खेडोपाडी कशी झाली क्रांती? जाणून घ्या रक्तरंजित इतिहास

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

माेठी बातमी! 'सोलापुरातील रोज चार व्यक्तींना पोटाच्या कर्करोगाचे निदान'; सकस आहार अन् स्वच्छतेचा अभाव, जंकफूडचे वाढते प्रमाण घातक

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

SCROLL FOR NEXT