Crime News 
पुणे

Video : पुण्यात 'मुळशी पॅटर्न' कायम? कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याची दहशत

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. अशाच एका भयानक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेच्या व्हिडीओमुळे मुळशी पॅटर्न चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. (Pune Crime News in Marathi)

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत मजावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सिंहगड लॉ कॉलेज रोडवर काल दोन तरुणांनी हातात चाकू सूरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला.

हेही वाचा क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे मार्शल यांनी या दोघांना पाठलाग करून पकडले. मात्र यातील एक जण पळून गेला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते. तर दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याआधी देखील दोघांनी एक किलो काजू कतली मोफत मिळावी यासाठी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंदुकीतून गोळी न चालल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी… BMC साठी २२७ वॉर्डमधील उमेदवारांची लाँग लिस्ट; कोण कुठून मैदानात? पाहा एका क्लिकवर

Pune News : बावधनमधील विवा हॉल मार्क सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! ६ टन चोरीचे बॅटरी स्क्रॅप जप्त; छत्रपती संभाजीनगरमधून संशयित अटकेत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्यात होणार सहभागी

SCROLL FOR NEXT