Pune to Mumbai rally 
पुणे

सायकल चलावो, इम्युनिटी बढाओ...; जनजागृतीसाठी आठ तासांत पुणे-मुंबई रॅली पूर्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सायकल चलावो, इम्युनिटी बढाओ’ हा संदेश देण्यासाठी पुण्यातील सायकलवीरांनी पुणे ते मुंबई ही दीडशे किलोमीटरची सायकल रॅली आठ तासांत पूर्ण केली. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.

पुण्यातील स्वानंद ॲडव्हेंचर्स या संस्थेने या रॅलीचे आयोजन केले होते. शनिवारवाडा येथे आज पहाटे सहा वाजता ‘सकाळ’चे  संपादक सम्राट फडणीस यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. या रॅलीत अठरा ते ५८ वयोगटातील वरुण पितळिया, सिद्धांत पितळिया, ओम जगताप, सिद्धांत छाजेड, सुधीर गायकवाड, नितीन चितोडकर, ऋषभ शाह, संजीव शाह, तुषार मोड, साधना शाह आदी सहभागी झाले होते.  

रॅलीत सहभागी झालेले ५८ वर्षीय संजीव शहा म्हणाले, ‘‘सायकल चालविणे हा अनेक आजारांवरचा उत्तम उपाय आहे. त्याबरोबरच प्रतिकारक्षमताही वाढते. हा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. या प्रवासात जागोजागी आरोग्यवर्धनाची जागृती करण्यासाठी पत्रके वाटली. दुपारी चारच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाजवळ आम्ही पोचले. चांगला अनुभव मिळाला.’’

सिद्धांत छाजेड म्हणाले, ‘‘प्रत्येक वाढदिवसाला वेगळे काही तरी करीत असतो. यंदा स्वत:चे आरोग्य चांगले ठेवण्याबरोबरच इतरांमध्ये त्याविषयी जागृती व्हावी, हा उद्देश होता. सुमारे दीडशे किलोमीटर सायकल चालवून मुंबईत पोचले, तेव्हा खूप आनंद झाला. तेथील नागरिकांमध्येही आमच्या उपक्रमाबद्दल कुतूहल वाटले. अनेकांनी भेटून  विचारपूस केली आणि शुभेच्छा दिल्या.’’

सायकल रॅलीत बहुतांश जण तरुण होते. त्यांनी प्रतिसाद दिला म्हणून रॅलीचे आयोजन करता आले. हे तरुण इतर तरुणांमध्ये सायकलविषयी जागृती करतील. यापुढेही अशा रॅलींचे आयोजन केले जाणार आहे.
- संजीव शहा, संस्थापक, स्वानंद ॲडव्हेंचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT