Unmarried Couples Banned From Pashan Lake eSakal
पुणे

Pune: १० उद्यानांना Couples Garden म्हणून घोषित करा; पाषाण तलाव वादानंतर मागणी

वैष्णवी कारंजकर

पुण्यातल्या पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घालण्यात आली होती. याबद्दलचा फतवा काढत पालिकेने तलाव परिसरात Couple is not Allowed असा फलकही लावला होता. मात्र काही संस्थांच्या विरोधानंतर हा फलक काढून टाकण्यात आला आहे. आता पुण्यात १० कपल्स गार्डन उभारण्याची मागणी केली जात आहे.

अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाला काही संस्था आणि नागरिकांनी, सोशल मीडिया तसंच निवेदन देऊन तीव्र विरोध दर्शवला होता. राईट टू लव्ह या संस्थेनं पालिकेने हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अशा मागणीचं निवेदनही पालिका आयुक्त आणि उद्यान विभाग अधिक्षक अशोक घोरपडे यांना दिलं होतं. त्यानंतर आता याच संस्थेकडून पुण्यात १० कपल्स गार्डन उभारण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.

अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात परवानगी का नाही?

पालिकेने हा बोर्ड लावल्याचं आणि अविवाहित जोडप्यांना विरोधाचं कारणही स्पष्ट केलं होतं. या जोडप्यांमुळे पक्षीनिरीक्षणात अडथळा येत असल्याचं महापालिकेने सांगितलं होतं. पण हा आदेश बेकायदेशीर आणि घटनेतल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा आहे,त्यामुळे हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी राईट टू लव्ह संस्थेनं केली होती.

त्यानंतर आता असे वाद पुन्हा होऊ नयेत, आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय न होता त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातल्या किमान १० गार्डन्सना कपल गार्डन्स म्हणून घोषित करा, अशी मागणी राईट टू लव्ह संस्थेनं केली आहे. आपण या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याची भूमिकाही या संस्थेनं घेतलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT