Corona_free_Patient
Corona_free_Patient 
पुणे

पुणे : कोरोनामु्क्तांच्या संख्येत वाढ; ७३ हजाराचा टप्पा ओलांडला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.७) दिवसभरात २ हजार ६२० नवे कोरोना (Covid-19) रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार २४९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ९६०, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ३२२, नगरपालिका क्षेत्रात ५८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही गुरुवार (ता.६) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील २८, पिंपरी चिंचवडमधील १८ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रातील दोघा जणांचा समावेश आहे. तर कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख दोन हजार ८८४ झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील ६३ हजार २८६, पिंपरी चिंचवडमधील २७ हजार ७८, जिल्हा परिषद क्षेत्रातील ७ हजार ९६३, नगरपालिका क्षेत्रातील दोन हजार ३६७ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील दोन हजार १९० रुग्ण आहेत. 

साडेत्र्याहत्तर हजार कोरोनामुक्त 

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी ७३ हजार ५०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४४ हजार ७७४, पिंपरी चिंचवडमधील १९ हजार ९१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार ५९१, नगरपालिका क्षेत्रातील एक हजार ६२० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक हजार ६१६ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT