Corona_Mask 
पुणे

Corona Updates: पुण्यात गेल्या चोवीस तासांत ५८२ जण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.८) दिवसभरात ५२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २१७ जणांचा समावेश आहे. रविवारी १ हजार ५९५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत ५८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २८ हजार ८९
झाली आहे. यापैकी ३ लाख नऊ हजार ३१० कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत ८ हजार ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३७३ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये १२३, जिल्हा परिषद क्षेत्रात ११९, नगरपालिका
क्षेत्रात ४७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १७ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ७ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १, नगरपालिका कार्यक्षेत्रातील १ आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शनिवारी (ता.७) रात्री ९ वाजल्यापासून रविवारी (ता.८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ६८ हजार ७५० कोरोना चाचण्या घेण्यात
आल्या आहेत. यापैकी पुणे शहरातील ७ लाख ५५ हजार ३०२ चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ४ लाख १९ हजार २१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ लाख ११ हजार ७५६, नगरपालिका क्षेत्रात ६४ हजार १२१ आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात १८ हजार ३५५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT