Rain Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६०.५४ टक्के पाऊस

पुणे शहर व जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (ता.२६) ४८९.४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या ६०.५४ टक्के एवढे आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर (Pune City) व जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (ता.२६) ४८९.४५ मिलिमीटर पाऊस (Rain) पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या ६०.५४ टक्के एवढे आहे. १ जूनपासून २६ जुलैपर्यंतचा हा पाऊस आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार ५०४ मिलिमीटर पाऊस हा मावळ तालुक्यात झाला असून सर्वात कमी म्हणजेच केवळ १४२ मिलिमीटर पाऊस शिरूर तालुक्यात नोंदला गेला आहे. (Pune District Receives 61 Percent of Annual Average Rainfall)

जिल्ह्याचा १ जून ते ३० सप्टेंबरअखेरपर्यंतचा वार्षिक सरासरी पाऊस हा ८०८.५१ मिलिमिटर इतका आहे. यापैकी दरवर्षी २६ जुलैपर्यंतचा म्हणजेच पावसाळ्यातील अनुक्रमे पहिल्या दोन महिन्यांचा सरासरी पाऊस हा ४६८.९५ मिलिमीटर एवढा आहे. प्रत्यक्षात या दोन महिन्यात ४८९.४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २०.८७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहराचा जून व जुलै या दोन महिन्यातील सरासरी पाऊस हा १६८.७० मिलिमिटर इतका आहे. प्रत्यक्षात शहरात आजअखेरपर्यंत १७४.५५ मिलिमिटर पाऊस झाला आहे. यापैकी ५.८५ मिलिमीटर हा पाऊस हा सोमवारी दिवसभरात झाला आहे.

कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील पावसाची नोंद केली जाते. यानुसार दैनंदिन पाऊस, महिनानिहाय आणि वार्षिक पाऊस अशा या नोंदी केल्या जातात. या नोंदीची जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या नोंदीशी तुलना केली जाते, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

शहर, जिल्ह्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

- पुणे शहर --- १७४.५५

- हवेली --- २४७.७०

- मुळशी --- १०३९.७७

- भोर --- ७६६.७४

- मावळ --- १५०४.६८

- वेल्हे -- १०७०.६१

- जुन्नर --- ४६५.५१

- खेड --- ३४५.८८

- आंबेगाव --- २८२.९२

- शिरूर --- १४२.६७

- बारामती --- १९२.८२

- इंदापूर --- २३७.२९

- दौंड --- १८७.९०

- पुरंदर --- १९३.२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT