Pune Farmer Suicide Sakal
पुणे

Pune: PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

आपल्या आत्महत्येला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचंही या शेतकऱ्याने म्हटलं आहे

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुण्यातल्या एका शेतकऱ्याने काल आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तलावात उडी मारून या ४५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जदारांच्या त्रासाला कंटाळून तसंच पिकाला योग्य दर न मिळाल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या शेतकऱ्याचं नाव दशरथ लक्ष्मण केदारी असल्याचं समोर आलं आहे. हा शेतकरी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या वडगाव आनंद गावातला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारी यांच्याकडून एका सुसाईट नोटही सापडली आहे. यामध्ये त्यांनी पिकाला योग्य दर न मिळाल्याचं तसंच कर्जदारांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.

केदारी यांनी आपल्या आत्महत्येला राज्य आणि केंद्र सरकारलाही जबाबदार धरलं आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या निष्क्रियतेला त्यांनी जबाबदार धरलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या एकट्याबद्दल विचार करत आहात, असंही त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT