domestic violence 
पुणे

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी शिवरकर कुटुंबावर गुन्हा दाखल

सुनेनं दिली शाररीक आणि मानसिक छळाची तक्रार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विवाहितेला मानसिक व शारिरीक त्रास देत तिचा कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजीत चंद्रकांत शिवरकर (वय ३८), चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर (वय ६९), कविता चंद्रकांत शिवरकर (वय ६६) आणि सोनाली सिध्दार्थ परदेशी (वय ४०, रा. लॉरेन्स कॉलनी, वानवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्नेहा अभिजीत शिवरकर (वय ३७, रा. जांभुळकर मळा, फातिमानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

कौटुंबिक छळवणुकीचा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत बी. टी. कवडे रस्त्यावरील लॉरेन्स कॉलनी येथे घडला. फिर्यादी स्नेहा या अभिजीत शिवरकर यांच्या पत्नी आहेत. स्नेहा यांना मधुमेह असल्यामुळे तसेच अन्य विविध कारणांवरुन पती आपल्याला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचं तसेच पतीनं आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT