IAS_Officers_Transfers_Pune 
पुणे

Big Breaking : पुण्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाची कुठे झाली बदली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी त्यांनी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज शनिवारी (ता.११) पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा बदल्यांमुळे चर्चेचा ठरला आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची महापालिका आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची 'पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सौरभ राव हे पुण्यात जिल्हाधिकारी होते. तसेच महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा उद्रेक शमविण्यासाठी राज्य सरकारने त्यांची पुण्यात विशेष नियुक्ती केलेली आहे. दीपक म्हैसेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार राव यांच्याकडे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने हे बदल केले आहेत. कोरोनाची स्थिती हाताळण्यात काही अधिकारी कमी पडत असल्याने त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांनी सांगितले होते.

पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक कमी करण्याचे आव्हान नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासमोर असेल. महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार ते सोमवारी स्वीकारणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

महापालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुठे यांना पदोन्नती मिळाल्याने ते आता अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुठे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बदली होणार नसल्याचे सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

तर गायकवाड यांच्याकडे पुन्हा साखर आयुक्तपदाचीच सूत्रे देण्यात आली आहे. जेमतेम साडेपाच-सहा महिन्यांतच गायकवाड यांची बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाऊन आणि त्यातून निर्बंध लादण्याला गायकवाडांचा विरोध असल्याने तडकाफडकी बदलले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या झाल्याने संपूर्ण प्रशासन हवालदिल झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT