Fraud Sakal
पुणे

लघुपटात अभिनयाची संधी देण्याच्या बहाण्याने कलाकारांची फसवणुक

फसवणुक करणाऱ्यास कोथरुड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुण कलाकारांना लघुपटामध्ये अभिनयाची संधी (Acting Chance) देण्याचा बहाणा करून त्यांची सव्वा दोन लाख रुपयांची फसवणुक (Fraud) करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) एकाला अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोहन उर्फ राजाशास्त्री मनोहर कुलकर्णी (रा. शिवाजीनगर, पालघर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय तरूणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 20 ऑक्‍टोबर ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मोहन कुलकर्णी हा दिल्ली व मुंबईत "राजा शास्त्री' नावाने वास्तव्य करीत होता. कला, नाट्य तसेच संगीत क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढत होता. ऑक्‍टोबर महिन्यात तो फिर्यादी तरूणीला भेटला.

त्याने तिला लघुपटामध्ये अभिनयाची संधी देण्याचे स्वप्न दाखविले. त्यानंतर त्याने फिर्यादीकडून विविध प्रकारच्या करांपोटी फिर्यादीकडून 99 हजार 283 रूपये घेतले. तसेच फिर्यादीच्या मामाकडूनही 95 हजार 944 रूपये आणि अन्य एका व्यक्तीकडून 29 हजार 944 रूपये असे एकूण सव्वा दोन लाख रुपये त्याने घेतले. त्यानंतर त्याने त्यांना कुठल्याही प्रकारचे काम दिले नाही. त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतरही तो टाळाटाळ करीत होता.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाणे गाठले. फिर्यादीप्रमाणेच त्याने मुंबईतही काही जणांना फसविल्याची तसेच त्याच्याविरुद्ध मुंबईमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नागराज बिराजदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT