yerawada
yerawada 
पुणे

पुणे : बदलीची भीती दाखवत महिला पोलिसाची फसवणूक; 'गुगल पे' मार्फत १०,००० उकळले

सकाळ डिजिटल टीम

पुणे : इतरत्र बदलीची भीती दाखवत येरवडा कारागृहातील एका महिला पोलिसाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याच समोर आलं आहे. एडीजी ऑफिसमधील क्लार्क असल्याचं सांगत अज्ञात व्यक्तीनं १०,००० रुपये या महिला पोलिसाकडूनउकळले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Fraud of female police by showing fear of transfer 10000 through Google Pay)

सविस्तर माहिती अशी की, एडजी ऑफिसमधून क्लार्क बोलतो आहे तुमची बदली करण्यात येत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ड्युटीवर होता त्या ठिकाणाहून ५ ते ६ तक्रारी आल्या असून तुमच्या ठिकाणच्या ५ मुलींना सस्पेंड करण्यात येत आहे, असं सांगत येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.

तुमची बदली रोखण्यासाठी मी प्रयत्न करतो एडजी साहेबांशी बोलतो. पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. माझ्या 'गूगल पे' वर १०,००० रुपये ट्रान्स्फर करा, अशी मागणी फसवणू करणाऱ्या व्यक्तीनं केली. पण संबंधित महिला पोलिसानं आपण इतके पैसे देऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर कथीत क्लार्क व्यक्तीनं तुमची बदलीची ऑर्डर काढण्यात येईल. ऑर्डर टाइप होत असून बाकीच्या मुलींची ऑर्डर तयार आहे, असं फोनवरुन सांगितलं. पण याप्रकरामुळं घाबरलेल्या या महिला पोलिसानं फोन करणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटवर १०,००० रुपये ट्रान्स्फर केले.

हे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आणि संबंधित महिला पोलिसानं याबाबत खात्री करुन घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याच तिच्या लक्षात आलं. त्यानंतर महिला पोलिसानं थेट येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT