pune sakal
पुणे

Pune Ganeshotsav : तंदुरुस्त बंदोबस्तासाठी पोलिसांना चिक्की वाटप

उत्तमनगरच्या जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचतगट संघाचा सलग १० वर्षे उपक्रम

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघ यांच्यावतीने उत्तमनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी- कर्मचारी वर्गाला चांगला तंदुरुस्त बंदोबस्त करण्यासाठी आज शनिवारी चिक्की वाटप केली. संघाच्या वतीने गेली १० वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.

उत्तमनगरचे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांच्याकडे बचत गट संघाचे अध्यक्ष सुरेश गुजर यांनी चिक्की सुपूर्त केली. यावेळी काही कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चिक्की वाटप केली. यावेळी बचत गट संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय वाघ, खजिनदार अंबादास धर्मकांबळे, सचिव सदाशिव लोले, मनीषा कांबळे, सचिन घुमे, अंकुश तिडके, राजू धोत्रे, एड.शंकर जाधव हे संचालक मंडळ उपस्थित होते.

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, म्हणून पोलिस सतर्क असतात. परिणामी त्यांना जास्त वेळ बंदोबस्त करावा लागतो. बंदोबस्तावरील पोलिस तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टिक आहार म्हणून बचत गट संघाने उत्तम दर्जाची चिक्की वाटप केली. असे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

‘या काळात पोलिसांना जादा बंदोबस्त असतो. विसर्जन मिरवणुकीला देखील जास्त वेळ थांबावे लागते. त्यामुळे, पोलिसांच्या आरोग्याची हेळसांड होते. बंदोबस्तासाठी आरोग्य चांगले असले पाहिजे. म्हणून योग्य आहाराबरोबर चिक्की असल्यास बंदोबस्ताचा ताण कमी होण्यास मदत होते. म्हणून हा उपक्रम ‘सकाळ माध्यम समूहाने’ सुरू केला होता. हा स्तुत्य उपक्रम आम्ही बचत गट संघाच्या वतीने गेली १० वर्षे हा उपक्रम राबवितो. असे बचत गट संघाचे अध्यक्ष सुरेश गुजर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT