Exam
Exam esakal
पुणे

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : कसं आणि कुठं रचलं कारस्थान?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फोडण्याचे कटकारस्थान अनिल गायकवाड नावाच्या आरोपीच्या घरी रचले गेले. त्याने हस्तलिखित पेपर टेलीग्रामद्वारे विजय मुऱ्हाडेला पाठविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अनिल दगडू गायकवाड (वय ३१, रा. किनगांव वाडी, ता. अंबड, जि. जालना) याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. या गुन्‍ह्यात बुधवारी (ता. १) विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (वय २९, नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना) याला औरंगाबादवरून अटक करण्यात आली आहे. तर पोलिस गणेश शिंदे आणि बबन मुंढे या आरोपींचा शोध घेत आहेत. गायकवाड याने चौकशी दरम्यान पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याने तो सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचे कटकारस्थान गायकवाड याच्या घरी रचले गेले.

यावेळी विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक तसेच अन्य कागदपत्रांची फाइल मुऱ्हाडेला या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींनी दिल्याचे गायकवाड याने सांगितले आहे. ती जप्त करायची आहेत. या खेरीज गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने गायकवाड याला सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पैशांत तिघांचा वाटा :

पेपर फोडल्यानंतर मिळणारे पैसे मुंढे, मुऱ्हाडे आणि गायकवाड अशा तिघांत वाटण्यात येणार होते. गायकवाड याने त्यांच्या बँक खात्याचे दोन धनादेश मुंढे याला विद्यार्थ्यांच्या पैशांच्या हमीच्या बदल्यात दिले होते, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. शिंदे आणि मुंढे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक औरंगाबादला रवाना झाले आहे.

गायकवाडला मिळाला मुंडेकडून पेपर :

३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान गायकवाड याला मुंढे याच्याकडून टेलीग्रामवर पेपर मिळाला होता. मात्र मुंढे याला हा पेपर कसा मिळाला व तो कोण आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT