Crime_Murder 
पुणे

नांदायला येत नाही म्हणून भर चौकात पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नांदायला येत नाही म्हणून कामावार निघालेल्या पत्नीचा भर चौकात चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना भेकराईनगर येथे बुधवारी (ता. ७) सकाळी घडली. आरोपी पतीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी हडपसर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शुभांगी सागर लोखंडे (वय २१, रा.हडपसर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. खून केल्याप्रकरणी पती सागर बाळू लोखंडे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि शुभांगी दोघांचाही दुसरा विवाह आहे. गेल्या वर्षी त्याचे लग्न झाले होते. सागर हा नेहमी दारु पिऊन शुभांगी यांना त्रास देत होता. त्याचा त्रासाला कंटाळून शुभांगी या अनेकदा माहेरी रहायला जात. सध्याही देखील त्या माहेरीच होत्या. आज सकाळी शुभांगी या त्यांची आई व मावशी यांच्यासोबत कामाला निघाल्या होत्या. सागरने तीघींना भेकराईनगर येथील शिवशक्‍तीनगर चौकात अडवले. तेथे त्याने शुभांगी यांना घरी नांदण्यासाठी घरी येण्याची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्यावर सागरने अचानक जवळ लपवलेला चाकू काढून त्यांच्या पोटात खुपसला.

शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी सागरला पकडून चोप दिला. यानंतर पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या शुभांगी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT