Crime esakal
पुणे

Pune : दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएसकडे; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश

तिघेही दहशतवादी कोंढव्यातील मीठानगर परिसरात दीड वर्षांपासून वास्तव्यास होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राजस्थानमधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट आखणारा मास्टरमाइंड इम्रान खान याच्यासह दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेल्या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी येत्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे कोथरूड परिसरात नाकाबंदीदरम्यान दोन फरारी दहशतवाद्यांना अटक केली होती. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकू साकी (वय २४, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) या दोघांना न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

तर पसार झालेल्या महम्मद शाहनवाझ शफीउररहमान आलम (वय ३१, मूळ रा. पेलावल, ता. हजारीबाग, झारखंड) याचा पोलिस शोध घेत आहेत. या तिघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

तिघेही दहशतवादी कोंढव्यातील मीठानगर परिसरात दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची ‘अह उल सफा’ शी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. इम्रान खान आणि युनूस साकी हे दोघेही ग्राफिक्स डिझायनर आहेत.

कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत त्यांच्या संपर्कात आणखी कोण होते? त्यांनी काही घातपाताचा कट रचला आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे. दरम्यान, एनआयएच्या अधिकाऱ्यांकडूनही आरोपींची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे तिघे दहशतवादी कोंढव्यातील मीठानगरमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या सदनिकेत राहत होते. संबंधित घरमालकाने याबाबत कोणताही भाडेकरार केला नसल्याचेही समोर आले आहे.

आरोपींकडून जिवंत काडतूस, चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली होती. हे जप्त करण्यात आलेले साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

दहशतवाद्यांना अटक केलेल्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपासासाठी दोघांना एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- संदीप कर्णिक, पोलिस सह आयुक्त.

पोलिस आयुक्तांनी बोलावली बैठक -

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित घटना टाळण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत, तसेच नाकाबंदी आणि कोंम्बिग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले

SCROLL FOR NEXT