Covid-Center
Covid-Center 
पुणे

पुण्यातील जम्बो सेंटरचे होणार ‘लाॅकडाउन’

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता जम्बो कोविड केअर सेंटरमधील उपचार व्यवस्था बंद करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालयाने मंगळवारी घेतला. येत्या एक जानेवारीपासून येथील उपचार थांबविण्यात येणार असून, नव्या रुग्णांना जम्बोत दाखल करून घेतले जाणार नाही. त्यानंतर मात्र गरजू रुग्णांना गरजेनुसार महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार दिले जातील. रुग्णसंख्येच्या तुलनेत जम्बोतील उपचार आणि अन्य बाबींवरील खर्च अधिक असल्याने हा निर्णय घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जम्बोत सध्या दीडशे रुग्णांवर उपचार सुरू असून, ते बरे होईपर्यंत त्यांना या ठिकाणी उपचार मिळतील. मात्र, आता नव्या रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची साथ वाढल्यानंतर गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार पुरविण्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात सुमारे आठशे बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. 

कोरोनाची साथ संपेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्टमध्ये जाहीर केले. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील अंदाजानुसार कोरोनाची दुसरी लाट आली नाही. त्याचवेळी रुग्णसंख्या कमी होऊन ती रोजची सरासरी दोनशेपर्यंत आली आहे. मृत्यूदरी दोन टक्‍क्‍यांच्या आत आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेगही मंदावला आहे. परिणाम, जम्बोत उपचारासाठी कमी रुग्ण येत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काही बेड कमी करण्याची चर्चा होती. मात्र, आता जम्बोतील उपचार व्यवस्थाच बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पिंपरीत जम्बो सुरू राहणार
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजार ६०० बेडची दोन जम्बो कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यात पुण्यातील जम्बोतील उपचार बंद केले, तरी पिंपरी-चिंचवडमधील जम्बोत रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. हे सेंटर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचारासाठी या सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. 

उपचाराची यंत्रणा कायम ठेवणार 
जम्बोत उपचार बंद केल्यानंतर उपचाराची यंत्रणा मात्र कायम ठेवण्यात येणार आहे. या पुढील काळात रुग्ण संख्या वाढल्यास तिचा वापर करता येईल, असे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपचार व्यवस्थेच्या सर्व सुविधा आहे त्या ठिकाणी राहतील. त्यातील ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड, मेडिकल सुविधेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

१०५ कोटी रुपये जम्बोचा खर्च
८०० बेडची संख्या
१३७ सध्या दाखल असलेले रुग्ण

जम्बोतील उपचार पुरविण्याचा पहिला टप्पा हा सहा महिन्यांचा आहे. तो आता संपला असून, याच काळात रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे उपचारासाठीचा मनुष्यबळावरील खर्च कमी करण्यासाठी जम्बोतील उपचार थांबविण्यात येतील. येत्या १ जानेवारीपासून नवे रुग्ण घेतले जाणार नाहीत.
- सौरभ राव, विभागीय आयुक्त

सध्याचे रुग्ण आणि त्यांच्या उपचाराची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या रुग्णालयातील व्यवस्था पुरेशी आहे.  नायडू रूग्णालयासह, बाणेरमधील स्वतंत्र कोविड हॉस्पिटल, लायगुडे आणि दळवी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी पुरेशी उपचार व्यवस्था आहेत. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT