Pune
Pune sakal
पुणे

पुणे तिथे लसीकरण उणे !

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन आठ महिने झाले, तरीही केवळ २३ टक्के जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांत पुणे शहरात १९७ दिवस लसीकरण झाले आहे. त्यात २७ लाख ९९ हजार १४१ जणांनी लस घेतली आहे. म्हणजेच शहरात सरासरी रोज १४ हजार २०८ जणांना लस मिळाली आहे. शहरात रोज किमान ५० हजार जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. खासगी रुग्णालयात एका दिवसात आत्तापर्यंत २७ हजार हा लसीकरणाचा सर्वोच्च आकडा आहे. मात्र, मुबलक प्रमाणात लस मिळत नसल्याने लसीकरणाची गती कमी आहे. याच पद्धतीने लसीकरण झाल्यास उर्वरित ४० लाख डोस देण्यासाठी आणखी ३०० दिवस मोहीम राबवावी लागेल, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगट यांचे लसीकरण सुरू केले. मे महिन्यापासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. पुणे शहरात ३४ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत, प्रत्येकाचे दोन डोस याप्रमाणे किमान ६८ लाख डोसची शहराला आवश्‍यकता आहे. खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस उपलब्ध होत आहे, पण एका व्यक्तीच्या लसीकरणासाठी किमान १५०० ते १६०० रुपये खर्च येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या मोफत लसीवरच बहुतांश पुणेकर अवलंबून आहेत.

१६ जानेवारी ते १६ ऑगस्ट या आठ महिन्यांत शहरात एकूण २७ लाख ९९ हजार १४१ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी २० लाख ५९ हजार ४८९ जणांचा पहिला डोस तर ७ लाख ३९ हजार ६५२ जणांचे दोन्ही डोस झालेले आहे.

लसीकरण टक्केवारी

एकूण लसीकरणाच्या २६.८० टक्के तर एकूण पात्र लोकसंख्येच्या २३ टक्के नागरिकांनी दोन्ही घेतले आहेत. दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या फक्त ८२ हजार ३२४ आहे. तर अजून सुमारे ६ लाख नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

  • आठ महिन्यांत लाभार्थी - २३ टक्के

  • लसीकरणाचे दिवस फक्त - १९७

आणखी ४० लाख डोसची गरज

शहरात किमान ३४ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. आत्तापर्यंत सुमारे २८ लाख जणांचा पहिला डोस झाला आहे. जे नागरिक लसीकरणापासून लांब राहत आहेत, त्यांच्यासाठी खास मोहीम शिबिर घेतले जात आहे. त्यामुळे सर्व घटकांना लस मिळत आहे. शहरात खासगी रुग्णालयाकडूनदेखील गतीने लसीकरण करण्यासाठी हातभार लागत आहे.- डॉ. सूर्यकांत देवकर, प्रमुख, लसीकरण मोहीम

लशीचा एक डोस घेतलेल्यांना ‘डेल्टा’पासून जास्त संरक्षण मिळत नाही. त्यामुळे वेगाने लसीकरण करून दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. सध्याची स्थिती असमाधानकारक आहे.- डॉ. अनंत फडके, जन आरोग्य अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT