Drainage Line
Drainage Line Sakal
पुणे

पुणे : लक्ष्मी, बाजीराव मार्गांवरील ४५ वर्षे जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलल्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लक्ष्मी रस्त्यावरील (Laxmi Road) १९७५ मधील, तर बाजीराव रस्ता (Bajirao Road) आणि शिवाजी रस्त्यावरील (Shivaji Road) त्याच दरम्यानच्या सुमारे ४५ वर्षांहून अधिक आयुर्मान असलेल्या या सांडपाणी वाहिन्या. 9Drainage Line) शहर वाढले, लोकसंख्या वाढली. मात्र, सांडपाणी वाहिन्या तशाच होत्या. त्यामुळे वारंवार ड्रेनेज तुंबण्याच्या तक्रारी (Complaint) होत्या. दाटवस्ती आणि अत्यंत वर्दळीचा हा भाग असल्याने त्या बदलणे शक्यही होत नव्हते. आता मात्र त्या बदलण्यात येत आहेत. कारण हे शक्य झाले आहे ते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे. (Pune Laxmi Bajirao Road Drainage Line Change)

लक्ष्मी रस्ता, बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील ४५ वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या या सांडपाणी वाहिन्या अत्यंत जीर्ण झाल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीत वाढलेल्या लोकसंख्येला त्या अपुऱ्या देखील पडत होत्या. लॉकडाउनचा फायदा घेऊन महापालिकेने या तिन्ही रस्त्यावरील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील या तिन्ही रस्त्यांवरील सांडपाणी वाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. निर्बंधांमुळे वर्दळ कमी आणि बाजारपेठ बंद असल्याने हे शक्य झाले आहे. २०४७ मधील लोकसंख्येचा विचार करून हे काम करण्यात येत आहे.

- जगदीश खोनोरे, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका

२०४७ मधील लोकसंख्येचा विचार

लक्ष्मी रस्त्यावरील कामादरम्यान सांडपाणी वाहिनीच्या कॉलर जॉइंटवर १९७५ मधील उल्लेख असल्याचे आढळून आले आहे. त्याच दरम्यान काही महिने पुढे-मागे बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील सांडपाण्याच्या वाहिन्या टाकण्यात आल्या असल्याचे आढळून आले आहे. त्या वेळी टाकण्यात आलेल्या या सांडपाणी वाहिन्या ३०० ते ४५० मिलिमीटर व्यासाच्या होत्या. आता मात्र त्या बदलून नव्याने सांडपाणी वाहिनी टाकताना २०४७ मधील लोकसंख्येचा विचार करून काही ठिकाणी ९००, तर काही ठिकाणी सहाशे मिलिमीटर व्यासाच्या टाकण्यात येत आहेत.

दृष्टिक्षेपात काम (खर्च सुमारे नऊ कोटी रुपये)

  • शहराच्या मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या भागातील हे रस्ते

  • बाराही महिने आणि चोवीस तास या रस्त्यावर मोठी वर्दळ

  • त्यामुळे ते बंद ठेवणे शक्य होत नाही

  • पर्यायी मार्गही नसल्याने हे काम अनेक वर्षे रखडले

  • सध्या रस्त्यावरील वर्दळ कमी, बाजारपेठाही बंद

  • या संधीचा फायदा घेऊन काम हाती घेण्यात आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT