गोळीबाराची अफवा
गोळीबाराची अफवा 
पुणे

न झालेल्या गोळीबारामुळे झाली सांगवी पोलिसांची पळापळ

मिलिंद संधान

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या दीपक पाटील (वय २१, राहणार काशिद पार्क, पिंपळे गुरव) असे त्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडविधान कायदा ३८०, १८२, २११, ५०५ (१) (ब) या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की मंगळवार (ता. १९) रोजी रात्री साडेबारा वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला पिंपळे गुरव येथील शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याची माहिती एका महिलेने दिली. त्यांनी लागलीच ती माहिती  सांगवी पोलिसांना दिली. त्याप्रमाणे रात्रपाळीत काम करणारे पोलिस उपनिरिक्षक अमित शेटे व मार्शल तातडिने घटना स्थळी हजर झाले असता त्यांना तेथे असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे निदर्शनास आले. आजुबाजुचे सुरक्षा रक्षकांशीही शेटे यांनी चौकशी केली. पोलिस नियंत्रण कक्षास फोन करणाऱ्या व्यक्तीनेही त्याचा फोन बंद केल्याने पोलिसांंचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर हिंजवडी व पुणेशहर च्या रात्रपाळीतील पोलिस अधिकार्र्यांनी घटना स्थळास भेट दिली व अधिक पोलिस कर्मचारी वर्गास तेथे पाचारण केले व अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलिस उपायुक्त बावीसकर, गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील वरीष्ठ पोलिस निरिक्षक व सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख अजय चांदखेडे, अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरिक्षक बलभीम ननवरे, अमित शेटे व त्यांच्या सहकार्र्याःनी  फोन करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

त्यानुसार पोलिसांना आलेल्या फोन धारकाचा शोध घेतला असता तो हनुमान सुधाकर कलगाने (वय १८, राहणार पिंपळे गुरव) याचा निघाला. त्याने फोन सोमवार (ता. १८) रोजी रात्री दहा वाजता चोरीस गेल्याचे सांंगितले. त्यामुळे गुंता अधिकच वाढत गेला. पण पोलिसांनी हार न मानता कलगाने यांच्या मदतीने कसून शोध घेतल्यानंतर आरोपी प्रसाद उर्फ लल्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला. व कलगाने यांचा फोन चोरून महिलेच्या आवाजात खोटा फोन करून न झालेल्या गोळीबाराची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT