संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
पुणे

पुणेकरांना करता येईल दरवर्षी १३३० कोटींची बचत

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणेकर त्यांच्या कामकाजाची आवश्यकता व गरजांना अनुरूप ठरतील अशा ठिकाणी वास्तव्य करतील तर दरवर्षी १३३० कोटींची बचत करू शकतील असे नोब्रोकर या भारताच्या ऑनलाइन रिअल इस्टेट बाजारपेठेमधील आघाडीच्या कंपनीने पुणे शहरातील प्रवास करण्याच्या पद्धतींवर केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे.

नोब्रोकरने केलेल्या अभ्यासात पुणेकर सुयोग्य ठिकाणी राहणार असतील, तर त्यांचे वर्षभरात १३३० कोटी रुपये आणि प्रवासाच्या ३९,४०० वर्षांची बचत होईल. आपापल्या कामकाजाला सुयोग्य ठरतील अशी ठिकाणे पुणेकरांनी निवडली तर त्यांना प्रवासाचा जो त्रास होतो त्यात लक्षणीय दिलासा मिळेल.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये काम करणा-या लोकांची संख्या सुमारे २४.६ दशलक्ष आहे. ज्यापैकी १५.७ लक्ष लोक कामाला जाण्याकरिता सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करतात. फक्त १२ टक्के लोक असे आहेत की त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला १५ मिनिटे पुरतात, २३ टक्क्यांना ३० मिनिटे तर ६५ टक्के लोकांना ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी कामाच्या ठिकाणी पोहोचायला लागतो. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून यामुळे प्रवासादरम्यान त्यांच्या खर्चात भर पडत आहे.

नोब्रोकरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व सह-संस्थापक श्री. अखिल गुप्ताम्हणाले, "जनगणना २०११ नुसार जवळपास ६७ टक्के पुणेकर मुख्यतः त्यांचे ऑफिस व घरादरम्यानच्या प्रवासासाठी मौल्यवान वेळ व ऊर्जा वाया घालवतात. नोब्रोकर व्यासपीठाकडे लाइफस्कोअर नावाचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य शहरातील योग्य ठिकाणी जात वेळ व पैशाच्या संदर्भात प्रति महिना किती बचत करता येऊ शकते याचे गणन करण्याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. वाहतूक कमी झाल्याने प्रदूषण कमी होते, परिणामतः पर्यावरण चांगले राहते."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT