लाटणे मोर्चा
लाटणे मोर्चा 
पुणे

महागाईविरोधात शिवसेनेचा लाटणे मोर्चा

यशपाल सोनकांबळे

पुणे : गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल, दुध, साखर, तेलाची अशा जीवनावश्यक वस्तुंची भाववाढीमुळे झालेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्यसरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढण्यात आला.

या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. "महागाई वाढली बुलेट ट्रेन च्या वेगाने, कधी येणार अच्छे दिन, भाजप एक धोका है, देश बचालो मौका है, पेट्रोल भाज्यांनी रडवले रे अच्छे दिन आणणाऱ्यानी फसवले, एवढी लाटणे कशाला, भाजपाला ठोकायला," अशा भाजपविरोधात घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत, शहराध्यक्ष विनायक निम्हण, सेनेचे पालिकेतील गटनेते संजय भोसले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे, बाबा धुमाळ, दत्ता टेमगिरे, महिला आघाडीच्या तृष्णा विश्वासराव, निर्मला केंडे, कीर्ती फाटक, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, माजी नगरसेवक प्रशांत बधे , संजय मोरे, युवा सेनेचे किरण साळी आदी उपस्थित होते.

जीवनावश्यक वस्तू वरील दर स्थिर ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला. वाढत्या महागाई विरोधात हा सार्वसामान्यांचा आक्रोश आहे, सत्तेत जरी असलो तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत राहणार असल्याचा निर्धार यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT