murlidhar mohol.jpg
murlidhar mohol.jpg 
पुणे

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोनाने शिरकाव केल्यापासून पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जोरदारपणे लढणाऱ्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरही शनिवारी कोरोनाने हल्ला केला. कोरोनाच्या या हल्ल्यानंतरही पुणेकरांना सुरक्षित ठेवण्याचा शब्द देत महापौर मोहोळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात रवाना झाले. तत्पूर्वी ' मी बरा आहे तुम्ही खूप काळजी घ्या' असा सल्ला देतानाच उपचारानंतर मी तुमच्या सेवेत येणार असल्याचा विश्वासही महापौर मोहोळ यांनी पुणेकरांना दिला. दरम्यान महापौर मोहोळ यांना हलका ताप असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट शनिवारी सायंकाळी आला.

पुण्यात ९ मार्चला कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे अवघे शहर हदरले आणि कोरोनापासून पुणेकरांचा बचाव व्हावा यासाठी मोहोळ यांनी आरोग्य यंत्रणांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा आवाका वाढतच राहिल्याने सगळ्या यंत्रणा तोकड्या ठरण्याची भिती होती. तरीही कोरोनाचा अटकाव करण्यासाठी महापौर मोहोळ हे रस्त्यावर उतरुन स्वत: उपाययोजना आखत होते.

संपूर्ण शहाराचा आढावा घेत महापौर मोहोळ दिवसात ८ ते १० बैठका घेण्याचा सपाटा लावत होते. त्याशिवाय महापालिकेच्या नायडूसह खासगी रुग्णालयातील माहितीही घेत राहिले. तसेच रुग्णांना आवश्यक असलेल्या सूचनाही देत होते. राज्य सरकारमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन निरनिराळ्या योजना आखत होते. मात्र दुर्देवाने महापौर मोहोळ यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी महापालिकेसह संबंध शहर पुन्हा एकदा प्रचंड घाबरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT