Murlidhar_Mohol 
पुणे

Ganeshotsav 2020 : पुणेकरांनो, 'श्रीं'च्या विसर्जनाबाबत महापौरांनी केलंय विशेष आवाहन; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Festival 2020​ : पुणे : घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्‍यतो घरातच करावे. पर्यायच नसेल तर महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या फिरत्या विसर्जन हौदामध्ये करावे अथवा महापालिकडून उभाण्यात येणाऱ्या मूर्तिदान केंद्राच्या ठिकाणी मूर्तिदान करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केले. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर, नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांना सकारात्मक साथ दिली आहे. गणेशोत्सवामध्येही नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षाही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली. 
महापौर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१७) गणेशोत्सव आणि प्रामुख्याने गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मोहोळ यांनी हे आवाहन केले. 

मोहोळ म्हणाले, 'कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. शहरात दरवर्षी सहा लाख गणेश मूर्तीचे घरगुती पूजन होते. विसर्जनाच्या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच मूर्तीचे विसर्जन करावे. ज्यांना पर्याय नसेल त्यांच्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात येईल.

एका संस्थेने यासाठी हौदाची व्यवस्था असलेली तीस वाहने 'सीएसआर'च्या माध्यमातून देण्याची तयारी दर्शविली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या हौदांचा मार्ग, वेळ याची माहिती स्थानिक नागरिकांना देण्यात येईल. तसेच मूर्तिदानाबाबतही क्षेत्रीय कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या ठिकाणांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नागरिकांनी सहकार्य करावे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT