Murlidhar_Mohol 
पुणे

कोरोनामुक्त झाल्यानंतर महापौर पुन्हा कामावर हजर; कोरोनाविरुद्ध नव्या लढाईचे दिले संकेत!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनापासून पुणेकरांचा बचाव करण्याच्या उद्देशाने लढताना कोरोनाची लागण झालेले महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (ता.२०) महापालिकेत 'एन्ट्री' केली आणि तयारीनिशी नव्या लढाईचे संकेत दिले. अत्यवस्थ रुग्णांकरिता बालेवाडीत तब्बल आठशे बेडचे नवे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय महापौर मोहोळ यांनी घेतला.

परिणामी, रुग्णांना 'आयसीयू' आणि 'ऑक्‍सिजन' बेड मिळणार आहेत. तसेच, पुढच्या आठवडाभरात सव्वाशे ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी कार्यवाही सुरू केली. बालेवाडीतील नियोजित (तात्पुरते) हॉस्पिटल पुढच्या पंधरा दिवसांत तयार होईल, असा शब्दही मोहोळ यांनी दिला. 

कोरोनामुक्त झालेले महापौर मोहोळ 'होम क्वॉरंटाइन'नंतर सोमवारी पहिल्यांदा महापालिकेत आले. त्यानंतर गेल्या दिवसांतील स्थितीचा आढावा घेत त्यांनी नव्या सुविधांचे नियोजन केले. उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक अजय खेडेकर, सुशिल मेंगडे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते. 

महापौर मोहोळ म्हणाले, ''कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी तपासणी वाढून रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र, आता मृत्यूदरही वाढल्याने ते कमी करण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविणार आहोत. सध्या खासगी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलमधील बेड वाढवित आहोत. तरी अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत नसल्याने 'आयसीयू' आणि ऑक्‍सिजन बेड वाढविण्यात येणार असून, १२५ बेड लगेच उपलब्ध होत आहेत. तर 'पीएमपीआरडीए'च्या माध्यमातून बालेवाडी तात्पुरत्या स्वरुपात हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ते पुढील सहा महिन्यांसाठी असेल. त्याचा खर्च, पुणे, पिंपरी-चिचंवड महापालिकांसह जिल्हा प्रशासन करेल.'' 

शहरातील खासगी हॉस्पिटलपाठोपाठ आता महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये (सीसीसी) 'ऑक्‍सिजन' बेड उपलब्ध होतील. ज्यामुळे या ठिकाणी उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये चार व्हेंटिलेटर आणि दहा 'आयसीयू बेड' तयार करण्यात येत आहेत. या सुविधांमुळे पुण्यातील मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, अशी आशा महापौर मोहोळ यांना आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 (Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT