Temperature 
पुणे

पुण्यात पाऱ्याने चाळीशी ओलांडली; विदर्भात येणार उष्णतेची लाट!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यासह राज्यातील सरासरी तापमानात रविवारी (ता.२४) लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. नागपूर येथे सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर पुणे शहरातही पाऱ्याने आज चाळीशी ओलांडली. रविवारी दिवसभर आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे होते. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी वाढ झाली होती. पुढील तीन दिवस तापमानात किंचितशी वाढ होणार असून, आकाश मुख्यत्वे निरभ्र आणि हवामान कोरडे असेल. सोमवारी (ता.२५) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी (ता.२८) कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी, उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे असेल. 

पुण्यात चाळीशी पार
शहर आणि परिसरातील तापमानात शुक्रवार (ता.२२)पासून लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सरासरी तापमान ३७.८ अंश सेल्सियस होते. रविवारी हेच तापमान ४१ अंश सेल्सियस झालेलं पाहायला मिळालं. लोहगाव येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तर पाषाण येथे ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उद्याही शहरातील तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचितशी वाढ हवामान विभाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.

पुण्यातील सरासरी तापमान अंश सेल्सिअसमध्ये :-

वार कमाल किमान
बुधवार ३७.२ २२.६
गुरुवार ३८.२ २३.६
शुक्रवार ३७.८ २३.८
शनिवार ३९.८ २४.२
रविवार ४०.२ २४.२

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune: पाणीटंचाईने सोसायट्यांचे गणित कोलमडले; टॅंकरच्या दरात वाढ : देखभाल शुल्क वाढल्याने सभासदांवर आर्थिक बोजा

SCROLL FOR NEXT