Pune Mess business most impact due to corona 
पुणे

पुण्यात डबेवाल्यांवरच आली उपासमारीची वेळ; उदरनिर्वाहासाठी करतायेत 'हे' काम

ब्रिजमोहन पाटील

पुणे : ''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलं-मुली दुपारी १२ वाजता आले की, आमची वाट पहात, गाडीवर डब्यांची पिशवी अडकून थेट विद्यापीठ गाठायचे. गरमा गरम जेवणाचा डबा घेऊन विद्यार्थी झाडांखाली, कॅन्टीनमध्ये बसून जेवण करत. गेले १५वर्ष हे काम व्यवस्थित सुरू होते. मात्र, कोरोना मुळे विद्यापीठ बंद झाले, मुलं गावाकडे निघून गेली. तेव्हापासून आमच्या डबे वाल्यांवरच उपासमारीची वेळ आली. नाईलाजाने मी गावाकडे आलो आहे, कोरडवाहू शेती करून घर चालवत आहे," अशा शब्दांत राजेंद्र वाघमोडे त्यांची कैफियत सांगत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठात जयकर ग्रंथालय, मुला मुलींच्या वसतीगृहांच्या बाहेर डबेवाले थांबलेले असतं. भुकेले विद्यार्थी जेवणाच्या डब्यासाठी ३०-३५ रुपये देऊन चार पोळ्या, दोन भाज्या, भात, वरण यावर ताव मारत पोटभर जेवण करतं. रोज दुपारी १२ ते २ या वेळेत २० ते २५ डबेवाले किमान दोन हजार विद्यार्थ्यांचे जेवू घालत होते. त्यापैकी एक होते राजेंद्र वाघमोडे. 

वाघमोडे सांगवी येथे पत्नी व मुलांसह रहात होते. त्यांनी २००५ पासून पुणे विद्यापीठात डबे पुरविण्याचे काम सुरू केले होते. सध्या रोज दुपारी पावणे तीनशे डबे विद्यापीठात घेऊन जात. विद्यार्थ्यांना विद्यापीठ सोडून जावे लागले आणि आमचा व्यवसाय ठप्प झाला, अले वाघमोडे सांगत होते. आता पुण्यात काम नसल्याने मार्च पासून ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथेच आहेत. घरच्या शेतीत दिवसभर काम करत आहे, असे वाघमोडे यांनी सांगितले. 

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

डब्यांऐवजी सिलेंडरचे वाटप
विशाल तोंडे हे पुण्यात आई सोबत रहात आहेत. ते सहा वर्षापासून विद्यापीठात जेवणाचे डबे घेऊन जात होते. लाॅकडाऊनमुळे विद्यापीठ ओस पडले, विद्यार्थी नाहीत त्यामुळे डबे पुरविण्याचे काम बंद पडले. आता उदरनिर्वाहासाठी औंध येथील एका गॅस एजन्सीमध्ये रोज ३०० च्या रोजगारावर सिलेंडर उचलण्याचे काम करत आहेत. 
विशाल म्हणाले, "विद्यापीठात दुपारी ७० तर रात्री ५० डबे घेऊन जात होतो. प्रत्येक डबा ३० रुपयाला जायचा. आईच्या मदतीला एक बाई पोळ्या करण्यासाठी ठेवली होती. मार्च पासून सर्वच बंद पडले, म्हणून आता नाईलाजास्तव सिलेंडर उचलण्याचे काम करत आहे. विद्यापीठात विद्यार्थी परतले तर आम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल."

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न 
सुरेंद्र आसवले म्हणाले, " माझा व्यवसाय चांगला सुरू होता, पण पाच महिने झाले काही काम नाही. आत्ताच छोट्या मुलीला १०वीत  ९१ टक्के पडले, तर मोठी बीएससी शेवटच्या वर्षात आहे. पैशाची अडचण असल्याने शुल्क कसे भरावे हा प्रश्न अाहे. त्यामुळे उसणे पैसे मागत आहे, दोन महिन्याचे भाडे ही थकले आहे. विद्यापीठात पुन्हा डबे सुरू होण्यास वेळ लागणार आहे, तो पर्यंत वडा पावची गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आहे."

पुणेकरांनो, यंदा बाप्पा येणार तुमच्या दारी !

डबेवाल्यांनी गाठले गाव
पुणे विद्यापीठात जयकर ग्रंथालय व वसतिगृह परिसरात २० ते २५डबेवाले येत. या सगळ्यांचे मिळून रोज दुपारी किमान २ हजार विद्यार्थी जेवण करत. मात्र आता डबे बंद झाल्याने अनेकजण गावाकडे निघून गेले. गावाकडे कोणी शेती, मजूरी, बिगारी काम करून संसार चालवत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT