कोथरुड : कोथरुडच्या लक्ष्मीनगर मध्ये स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतल्यावर वाचनालयाचे उद्घाटन करुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खादी खरेदी करत कार्यकर्ते व कोथरुडकरांसोबत गांधी जयंती साजरी केली. लक्ष्मीनगर मध्ये हातात झाडू घेवून आमदार पाटलांनी नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, मंजुश्री खर्डेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, गिरीश भेलके आदींच्या सोबत अण्णाभाऊ साठे सभागृह परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छता मोहीमेची सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, लक्ष्मीनगर मधील सर्व स्वच्छतागृहे जेट मशिनच्या सहाय्याने स्वच्छ केली आहेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील स्वच्छतागृहे अशाच पध्दतीने लवकरच स्वच्छ केली जातील. नजीकच्या आठ दिवसात पुणे शहरातील सर्व मतदार संघात हा उपक्रम सुरु होईल महात्मा गांधी जयंती म्हणून स्वच्छता करतोय असे नाही. आम्ही कोथरुडमध्ये आठ लोकांची स्वच्छतेसाठी नेमणूक करत आहोत. त्यांचे वेतन लोकसहभागातून करणार आहे. ज्यामुळे कोथरुड मतदार संघातील सर्व स्वच्छतागृहे कायम स्वच्छ राहतील.
पाटील म्हणाले की, पंतप्रधानांच्या आदेशानुसार आम्ही हा सेवा सप्ताह आयोजित केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता संपलेली नाही. पण त्यांची अवस्था भयानक आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला की लोकसहभागातून या स्वच्छतागृहांची सुधारणा केली पाहिजे. सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करायची. दारे, भांडी, नळ दुरुस्त करायचे. प्रत्येक महिला स्वच्छतागृहात एक सॅनिटरी नॅपकीनचे व दुसरे सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावणारे. या मशिनची जबाबदारी वस्तीची राहील.
कार्यकर्त्यांना सुचना
येथे आलो तेव्हा पाहिले की रस्त्याने सर्वत्र पाणी वहात आहे. प्रत्येकाच्या दारातील पाणी एका पाईपने खाली जाईल अशी व्यवस्था करा. जेणेकरुन रस्त्याने चालताना कोणालाही हाताने पँट वर करुन चालायची वेळ येणार नाही.
दादांची खादी खरेदी
पंतप्रधान मोदींच्या आवाहना नुसार आमदार पाटील यांनी कर्वेरस्त्यावरील खादी भांडारातून खादीचे कापड खरेदी केले. येथे एवढे रंग असताना तुम्ही पांढरा रंग का निवडला यावर दादा म्हणाले की, मी नेहमीच पांढरा रंगाचा शर्ट घालतो. मी पुर्वी लिनन खादी वापरत होतो. आज चरख्यावर विणल्या जाणारे प्युवर खादीचे कापड घेतले. विकसीत देश होण्यासाठी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे.
स्वबळाचा नारा
भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. ९७००० बुथवर प्रत्येकी दहा जणांची नेमणुक केली आहे. आता ती तीस पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत. त्यासाठी आमची तयारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.