Mundhwa Land Deal Probe Ordered

 

Sakal

पुणे

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन प्रकरणात गैरप्रकार खपवून घेणार नाही : एकनाथ शिंदे

Mundhwa Land Deal Probe Ordered : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, अहवालानंतर 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल आणि गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 'दूध का दूध और पानी का पानी' होईल. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कर्वेनगर येथे रविवारी (ता.९) सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, "" लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकेल." माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, त्यांनी हा विषय आता संपला आहे असे सांगत, या विषयावर अधिक बोलणे टाळले.

शिवसेना-पतित पावन हे भगव्या रंगाचे दोन प्रवाह' : शिंदे

"“हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत ठेवण्याचे कार्य आज काही मोजक्या संघटना करत आहेत. त्यात पतित पावन संघटनेचे योगदान मोठे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्व विचारधारेच्या प्रसारासाठी झाला. आज शिवसेना आणि पतित पावन संघटना हे भगव्या रंगाचे दोन प्रवाह एकत्र आले आहेत; हा हिंदुत्वासाठी ऐतिहासिक क्षण आहे,"" असे शिंदे यांनी नमूद केले.

कर्वेनगर येथे पतित पावन संघटनेतर्फे रविवारी रात्री आयोजित ‘युती हिंदुत्वाची’ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रविंद्र धंगेकर, तसेच पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, सरचिटणीस नितीन सोनटक्के, शहरप्रमुख श्रीकांत शिळीमकर आदी उपस्थित होते.

'खुर्ची दिसली की रंग बदलत नाही' -

'लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय असून, ती बंद होणार नाही. आमच्यासाठी राजकारणात शब्दाला महत्त्व आहे. बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरूनच आम्ही काम करत आहोत. काही लोकांसारखे आम्ही खुर्ची दिसली की रंग बदलत नाही, ” असे शिंदे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar fraud: नगर शहरातील डाॅक्टरला व्यवहारातून १४ कोटींचा गंडा; जागेचा व्यवहार नडला, नेमकं काय घडलं..

Nashik weather : कडाक्याची थंडी! नाशिक गारठले, धुळ्यात पारा ८.६ अंशांवर; नागरिक शेकोट्यांभोवती गोळा

Mumbai News: बाबुलनाथ मंदिराची ‘ती’ जागा रिकामी करा, उच्च न्यायालयाकडून ‘कनिष्ठ’चा आदेश कायम

Anushka Sharma Comeback : अनुष्का शर्मा परत येतेय! सात वर्षांनी पुन्हा सिनेमामध्ये दिसणार, ‘चकदा एक्स्प्रेस’च्या रिलीजबाबत मोठा अपडेट!

Latest Marathi Breaking News : त्यांना 'खिचडी चोर' का म्हटले जाते याचा त्यांनी विचार करावा - राम कदम

SCROLL FOR NEXT