Corona-Restricted-Area 
पुणे

पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन बाधित (कंटेन्मेंट) आणि सूक्ष्मबाधित क्षेत्रांची नव्याने रचना करण्यात येणार आहे. त्यात दोन्ही क्षेत्रांतून काही परिसर वगळण्यात येतील; तर नवे परिसरही जोडण्यात येतील, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शनिवारी स्पष्ट केले.

यासंदर्भातील आदेश येत्या सोमवारी (ता.15) काढण्यात येणार आहेत. दरम्यान, दुकाने बंद आणि उघडण्याबाबत कोणताही नवा निर्णय नसेल, हे मात्र गायकवाड यांनी आर्वजून सांगितले. त्यामुळे शहरातील सद्य:स्थितीतील व्यवहार सुरळीत राहणार असल्याचे स्पष्ट आहे. 

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, शनिवारी रात्रीपर्यंत हा आकडा सव्वानऊ हजारापर्यंत पोहोचला होता. जुन्या बाधित क्षेत्रांसोबत त्याबाहेरही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून बाधित आणि सूक्ष्मबाधित भाग आखून त्याठिकाणी उपाय करण्यात येणार आहेत.

तेव्हाच, ज्या भागांतील रुग्ण कमी झाल्या आहेत; तो परिसर वगळण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे. परंतु, सध्या ज्या भागांत रुग्ण सापडेल, तो परिसर सील करण्यापेक्षा रुग्ण राहात असलेल्या घराचा भाग हा सूक्ष्मबाधित म्हणून जाहीर केला जाणार आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

शहरात येत्या सोमवारपासून म्हणजे, 15 जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार आहे, या चर्चेला मात्र महापालिका आयुक्त शेखर गावकवाड यांनी पूर्णविराम दिला. तुर्तास नव्याने कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत.

मात्र, रुग्ण संख्येचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर काही उपाय करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये बाधित आणि सूक्ष्मबाधित भागांचा समावेश राहणार आहे. त्याशिवाय नवे उपाय करण्यात येणार नाहीत, हेही गायकवाड यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Doctor Case : महिला डॉक्टरचे प्रकरण दुर्देवी, न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार शेतीचे मोठे नुकसान

Indian Destinations: भारतातील 'ही' 5 ठिकाणे परदेशापेक्षाही आहेत सुंदर, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT