Pune-Slum-Area 
पुणे

पुणे : झोपडपट्ट्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिकेने घेतला मोठा निर्णय; स्वखर्चातून करणार...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोविड-19 चा पेठा आणि झोपडपट्ट्यांमधील वाढता प्रभाव लक्षात घेऊन भविष्यात या परिसराचे नव्याने नियोजन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मालकीच्या जागांवर असलेल्या 22 झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन खासगी विकसकांऐवजी स्वत:च्या खर्चातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी (ता.४) ही माहिती दिली.

पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढली आहे. सोसायट्यांच्या परिसरातून सुरू झालेल्या या महामारीचा सर्वाधिक विळखा शहरातील पेठा आणि झोपडपट्ट्यांना पडला आहे. दाटवस्ती, अरुंद रस्ते, सार्वजनिक शौचालय आदी कारणांमुळे या भागात वेगाने या विषाणूचा संसर्ग वाढतो आहे.

त्यातून या विषाणूला रोखण्यासाठी प्रभावी अस्त्र असलेले सोशल डिस्टिसिंग पाळणे देखील शक्‍य होत नाही. त्यामुळे भविष्यात कोरोना अथवा अशा कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करावयाचा असेल, तर पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या भागाचे फेरनियोजन करून विकास करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांची संख्याही जवळपास 22 आहे. तर महापालिका आणि राज्य सरकार या दोघांच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांची संख्या ही सुमारे 15 आहे. या दोन्ही झोपडपट्ट्यांच्या खालील क्षेत्रही मोठे आहे. शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचे काम हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत (एसआरए) केले जाते. प्राधिकरणाकडून खासगी विकसकांकडून निविदा मागवून हे काम करण्यात येते.

परिणामी, त्यामध्ये अनेक अडचणी येऊन झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकसनास मर्यादा येतात. त्यामुळे आता महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास स्वत:च करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार करून तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. 

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- महापालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांची संख्या - 22 
- त्याखालील एकूण क्षेत्र - 1 लाख 93 हजार 383 चौरस मीटर 
- रेडी रेकनरमधील दरानुसार या क्षेत्राची किंमत - अंदाजे 300 कोटी 
- पुनर्विकासासाठी येणारा अपेक्षित खर्च - 75 ते 100 कोटी 
- खासगी विकसकाऐवजी महापालिकाच करणार झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT