वाहतुकीत बदल Sakal
पुणे

विजयस्तंभ अभिवादनानिमित्त पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : 1 जानेवारी 2022 रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त 31 जानेवारी सायंकाळी सात वाजल्या पासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar Highway) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे. याशिवाय अभिवादनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासासाठी वळविण्यात येणार आहे. (Pune Marathi News)

आशा प्रकारे वाहतूक वळविण्यात आली आहे.

1) पुण्याहून नगर कडे जाणारी जड वाहतूक खराडी बायपास मार्गे केडगाव - चौफुल - न्हवरा - शिरूर मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे.

2) सोलापूरहुन चाकण कडे जाणारी वाहतूक खराडी बायपास मार्ग विश्रांतवाडी - आळंदी - चाकण मार्गे वळविण्यात येणार आहे.

3) मुंबईहून नगरकडे जाणारे जड वाहतूक वडगाव मावळ - चाकण - खेड - मंचर - नारायणगाव आळेफाटा - नगर

4) मुंबई हुन नगर कडे जाणारी जड वाहने चाकण - खेड - पाबळ - शिरूर मार्ग नगर येथे वळविण्यात येणार आहे.

अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध ठिकाणी वाहनानुसार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पार्किंग स्थळापासून विजयस्तंभ पी एम टी बस ची सोय करण्यात आली आहे.

पार्किंग स्थळे पुढील प्रमाणे

पुण्याहून येणाऱ्या वाहनांसाठी ( कार )

* लोणीकंद येथील आपले घर शेजारी हनुमंत कंद यांची मोकळी जागा.

* लोणीकंद येथील आपले घर शेजारी संदीप सातव यांची मोकळी जागा.

* लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांची मोकळी जागा

* तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारील मोकळी जागा.

बस साठी - आपले घर सोसायटी मागील बाजू

आळंदी कडून येणाऱ्या वाहनांसाठी

* तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे

* तुळापूर रोड वाय पॉईंट शेजारील मोकळी जागा

थेऊर केसनंद कडून येणाऱ्या वाहनासाठी --

* सोमवंशी अकादमी समोरील मोकळी जागा

* खंडोबाचा माळ.

अष्टापूर, डोंगरगाव, पेरणेकडून येणाऱ्या वाहनासाठी

* पेरणे गाव छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा समोरील मोकळी जागा

दुचाकी साठी पार्किंग

टाटा मोटर्स समोरील मोकळे मैदान.

ज्योतिबा पार्क गो शाळा शेजारील मैदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT