Pune Naidu Hospital Want physician anesthesiologist and he got orthopedic eye doctor 
पुणे

Coronavirus : हवेत फिजीशिअन, भूलतज्ज्ञ; मिळाले हाडांचे, डोळ्यांचे डॉक्टर

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या नायडू रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी फिजिशिअन, भूलतज्ज्ञ डॉक्टरांची गरज असताना, आरोग्य खात्याकडून मात्र, हाडांचे, डोळ्यांचे, कान-नाक-घसा आदींचे डॉक्टर नियुक्त केले जात असल्याचे उघड झाले आहे. या बाबत महापालिकेने केलेल्या मागणीलाही आरोग्य खात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या नायडू रुग्णालयात महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून डॉक्टर नियुक्त केले जातात. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एमडी फिजिशिअन, भूलतज्ज्ञ असणे अपेक्षित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या तशा मार्गदर्शक सूचनाही आहेत. मात्र, आरोग्य खात्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये हाडांचे, डोळ्यांचे, कान-नाक-घसा, स्त्रीरोगतज्ज्ञ आदींचा समावेश आहे. मध्यंतरी त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनेही नियुक्त व्हावे, असा आदेश आरोग्य संचालक कार्यालयाने काढला होता. मात्र, सुदैवाने तो डॉक्टर नियुक्त झाला नाही.

पुण्यात सिंहगड रस्त्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस

सांसर्गिक आजारांवरील उपचार पद्धती, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात घ्यावयाची काळजी, व्हेंटिलेटरचा वापर आदींबाबत अन्य शाखांचे डॉक्टर प्रवीण नसतात. त्यामुळेच फिजिशिअन, भूलतज्ज्ञ नियुक्त करण्याचा वैद्यकीय प्रोटोकॉल आहे. मात्र, या डॉक्टरांचे एमबीबीएस झाले आहे, त्यामुळे ते करू शकतील, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱयांचे म्हणणे आहे. तर एमबीबीएस होऊन अनेक वर्षे उलटली आहेत, दैनंदिन काम वेगळ्या शाखेचे करीत असताना अचानक सांसर्गिक रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे अवघड आहे, असे त्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, त्याकडे आरोग्य खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य खात्याने नायडूमध्ये नियुक्त होण्यासाठी 10 डॉक्टरांची यादी नुकतीच तयार केली. त्यातील एकच डॉक्टर रुजू झाला आहे. तसेच यादीतील नाव काढून टाकण्यासाठी आरोग्य संचालक कार्यालयात डॉक्टर संबंधितांची 'मनधरणी' करतात. त्यामुळेच यादीत सहज बदल होतात, अशी चर्चा आहे. नायडू रुग्णालयात कोरोनाचे 180 ते 200 रुग्ण सरासरी असतात. सध्या 140 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच काही रुग्ण अतिदक्षता विभागात असून काही संशयितही आहेत. येथे सुमारे 20 डॉक्टर असून 56 परिचारिका आहेत.

Coronavirus : ब्रिटनमध्ये वाढवला 'या' तारखेपर्यंत लॉकडाऊन

या बाबत महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हुंकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे याबाबत म्हणाले, "कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रोटोकॉलनुसार डॉक्टर नायडू रुग्णालयात उपलब्ध झाले पाहिजेत, असे महापालिकेने आरोग्य खात्याला या पूर्वीच कळविले आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांची पद्धत केंद्र आणि राज्य सरकारने निश्चित केली आहे. त्यात डॉक्टर कोणत्या शाखेचे हवेत, हेही स्पष्ट करण्यात आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर डोळ्यांच्या किंवा हाडांच्या डॉक्टरांनी उपचार करणे निश्चितच योग्य नाही. आरोग्य खात्याने त्यांच्या कार्यपद्धतीत तातडीने बदल केला पाहिजे, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT