Citizens in Pune hold a symbolic funeral procession on Navale Bridge, protesting against frequent accidents and demanding immediate road safety action.
esakal
Pune Navale Bridge Accident Update: पुण्यातील नवले पुलावर काल भीषण अपघात झाला, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेत. या पुलावर सातत्याने अपघात घडत असतात, आतापर्यंत कितीतरी जणांचा बळी या ठिकाणी गेला आहे. सर्वसमान्य नागरिकांना तर नवले पुलावर जाणं म्हणजे जीव मुठीत धरूनच वाहन चालावावे लागते. वारंवार होणार अपघात मात्र तरीही काहीही ठोस उपाययोजना दिसत नाही, या निषेधार्थ कालच्या भीषण अपघातानंतर आज भुपेंद्र मोरे यांनी सरकारच्या विरोधात थेट नवले पुलावर तिरडी आंदोलन केलं.
या आंदोलनाचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वसामान्यांच्या त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकजणा हे आंदोलन योग्य असल्याचंही बोलून दाखवलं आहे. कारण, नवले पूल म्हणजे एकप्रकारे डेथ स्पॉट असल्याचंच बोललं जात आहे, एवढे भीषण अपघात या ठिकाणी घडले आहेत आणि अजूनही सुरूच आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गावर नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या १७ वाहनांना एकापाठोपाठ धडक दिली. आग लागलेल्या या धावत्या कंटेनरने समोरील कारला धडक दिली. त्यामुळे कारलाही आग लागून सात जणांचा जागीच होरपळून, तर मालवाहू टेम्पोमधील अन्य एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका लहान मुलीचा समावेश आहे. या अपघातात २० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येत असताना जांभूळवाडी पुलावर त्याचे ब्रेक निकामी झाले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या या भरधाव कंटेनरने समोरून जाणाऱ्या पिकअप टेम्पो, मिनी बस, आठ मोटारींसह दोन दुचाकी अशा १७ वाहनांना जोरदार धडक दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.