पुणे

पाचशे विमान प्रवासी त्रस्त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बंगळूर-पुणे आणि पुणे-बंगळूर विमानांच्या उड्डाणांना विलंब झाल्यामुळे सुमारे 350हून अधिक प्रवाशांना पुणे आणि बंगळूर विमानतळावर रात्र जागून काढावी लागली. तसेच नागपूरला जाणारे विमानाचे उड्डाण चार तास विलंबाने झाल्यामुळे त्यातील सुमारे 140 प्रवासी त्रस्त झाले. 

बंगळूर विमानतळावरून रविवारी रात्री साडेअकरा वाजता "गो एअर'च्या विमानाचे पुण्यासाठी उड्डाण होणार होते. सोमवारी पहाटे एकच्या सुमारास ते पुण्यात पोचणे अपेक्षित होते. त्यासाठी सुमारे 180 प्रवासी विमानतळावर थांबले होते; तर पुण्याहून तेच विमान सोमवारी पहाटे 1 वाजून 25 मिनिटांनी बंगळूरकडे जाणार होते. तेथे पहाटे तीन वाजता पोचणार होते. त्यासाठी सुमारे 170 प्रवासी लोहगाव विमानतळावर थांबले होते. बंगळूर आणि पुण्यात नोकरी करणाऱ्या अनेकांचा त्यात समावेश होता. रविवारची सुटी संपवून बहुतेक जणांना सोमवारी कामावर जायचे होते. बंगळूरहून पुण्याकडे येणारे विमान सुमारे दीड तास उशिरा निघेल, असे सुरवातीला सांगण्यात आले. नंतर पहाटे साडेचार वाजता ते रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले; तर पुण्याहून बंगळूरकडे जाणारे विमान पहाटे तीन वाजता निघेल, असे सुरवातीला सांगण्यात आले; परंतु पहाटे ते रद्द झाल्याचे सांगण्यात आले. सुमारे 40 प्रवाशांना मुंबईहून बंगळूरला पाठविण्यात आले. मात्र, उर्वरित प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. 

बंगळूर विमानतळावर तर प्रवाशांना चहाही विचारण्यात आला नाही, असे सचिन कुलकर्णी, विशाल अग्निहोत्री यांनी सांगितले. "गो एअर'च्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पुन्हा आमच्या एअरलाइनने प्रवास करू नका, असे त्यांना सांगण्यात आले. पुण्याहून सकाळी पावणेआठ वाजता नागपूरला निघणारे "गो एअर'चे विमानही सुमारे चार तासांनी उशिरा निघाले. या विमानाच्या बाबतीत कायमच असा प्रकार घडतो, असा अनुभव प्रवासी मुकुंद जोशी यांनी सांगितले. 

"गो एअर'ची माफी 
बंगळूर-पुणे आणि पुणे-बंगळूर विमानांचे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द झाले. पुण्याहून बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांची काळजी घेण्यात आली होती; तर नागपूरला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण तांत्रिक कारणामुळे उशिरा झाले. याबाबत प्रवाशांना वेळीच माहिती देण्यात आली होती. तसेच त्यांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनी माफी मागत असल्याचे "गो एअर'च्या सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT