पुणे

मुले बनली कुटुंबाची ‘टूर प्लॅनर'; पुणे ते मालदीव सहलीचे यशस्वी नियोजन

सकाळवृत्तसेवा

पुणे - कुटुंबासमवेत फिरायला जायचं म्हटलं की एकतर घरातील मोठी मंडळी नियोजन करतात, तेही शक्य नसल्यास एखादा ‘टूर एजंट’ गाठला जातो. परंतु आता पर्यटनाचे सर्व नियोजन करण्यात घरातील लहान मुले आग्रहाने पुढे येत असल्याचे दिसून येते. शालेय शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आता कुटुंबासाठीचे ‘टूर प्लॅनर’ बनू लागलेत.

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने पर्यटनाला गती मिळत आहे. अशात कुटुंबासमवेत पर्यटनाचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा कल अधिक आहे. अशात आता घरातील दहा ते पंधरा वर्षांची मुलेही पर्यटनाच्या नियोजनात रस घेऊ लागली आहेत. आदि आणि आद्या चोरडिया, आरना आणि अनाया लोढा, रितीका आणि रिधान कुंकूलोळ या मुलांच्या गटाने जानेवारीत आपल्या कुटुंबासाठी मालदीव येथील पर्यटनाचे यशस्वी नियोजन केले. 

‘‘आम्ही मुलांनी एकत्र येऊन यंदाच्या ‘टूर’चे नियोजन आपणच करू असे ठरविले आणि कामाला लागलो. सगळ्यांच्या एकत्रित ‘झुम’द्वारे ऑनलाइन बैठका होत होत्या. सगळ्यांची आवड लक्षात घेऊन पर्यटनासाठी स्थळ निश्चित करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली. पर्यटन स्थळ ठरल्यानंतर तेथील हॉटेल्सचा शोध इंटरनेटच्या सहाय्याने घेतला. घरच्या मोठ्या मंडळींनी दिलेल्या बजेटमध्ये संपूर्ण नियोजन करायचे होते. घरातून विमानतळ तेथून मालदिव आणि हॉटेल गाठण्याची सफर जबाबदारीची जाणीव करून देणारी होती, असा अनुभव आदि याने सांगितला.

रितीका म्हणाली, ‘‘एरवी आई-बाबा ‘टूर’चे नियोजन करतात, यावेळी आम्ही नियोजन करत होतो. त्यामुळे सगळ्याची नीट व्यवस्था होत आहे की नाही, याकडे लक्ष होते. त्यामुळे पर्यटनाची जबाबदारी आणि त्यातून मिळणारा आनंद अधिक सुखद करणारा होता.’’

हे शिकायला मिळाले
 सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा अनुभव
 जबाबदारीचे भान ठेवत आनंद घेणे
 ठराविक ‘बजेट’मध्ये चांगल्या पद्धतीने पर्यटनाचे नियोजन करणे
 पर्यटनाचे नियोजन करण्याचा मिळाला आत्मविश्वास


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT