Pune Municipal Corporation Sakal
पुणे

कोरोनाचे कॉफिटेबल बुक काढणे निषेधार्ह; राष्ट्रवादीचे आंदोलन

काळा इतिहास कॅफी टेबल बुकमधून मांडणार का? असा प्रश्‍न करत राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात महापालिकेत आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या काळात बेड मिळाले नाहीत, ॲब्युलन्स, औषधे मिळाले नाहीत. हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. हा काळा इतिहास कॅफी टेबल बुकमधून मांडणार का? असा प्रश्‍न करत राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात महापालिकेत आंदोलन केले. (Corporation coffee table book)

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कोरोना काळातील महापालिकेच्या कामावर २२० ते २५० पानाचे पुस्तक तयार केले जाणार आहे. यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च असून, एका पुस्तकाचा खर्च ३ हजार रुपयांपर्यंत असणार आहे. यासाठी बी पाकिट पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याविरोधात महापालिकेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे आदी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण अशा कॉफी टेबल बुकसाठी तिजोरी ओसंडून वाहत आहे. कोरोनाच्या काळातील पुणेकरांचे हाल आपण सर्वांनीच बघितले आहेत. आत्तापर्यंत ९ हजार जणांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पण कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या निधीचा वापर सुरू केला आहे, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली.

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहितीसह पुणे शहराचा गौरवशाली इतिहास मांडणारे कॉफी टेबल बुक काढले. पण भाजप शहराचा काळा इतिहास लाखो रुपये खर्च करू मांडत असल्याची टीका दीपाली धुमाळ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT