पिंपळे सौदागर : स्वराज चौक ते कोकणे चौकापर्यंत नव्याने विकसित होत असलेल्या या लिनियर गार्डनमध्ये तळीरामांनी रिचविलेल्या दारूच्या बाटल्यांचा ठिकठिकानी खच पडलेला दिसतो.  
पुणे

पुण्यातलं हे 'गार्डन' बनतेय 'ओपन बार'...!

मिलिंद संधान

नवी सांगवी : पिंपळे सौदागर येथील स्वराज चौक ते कोकणे चौकापर्यंत अडीच किमीपर्यंत विकसित होत असलेले लिनियर गार्डनला सध्या तरी ओपन बारचे रूप आल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महत्वकांशी प्रकल्पापैकी हा प्रकल्प केवळ सौदागर पुरता मर्यादित न भविष्यात शहराचे भूषण ठरणार आहे. त्याकरीता युध्द पातळीवर येथे कामही सुरू असुन एवढ्या चारपाच महिण्यात तो पुर्णत्वालाही लागणार आहे.

परंतु दिवसेंदिवस या ठिकाणी वाढणाऱ्या तळीरामांची संख्या पाहता भविष्यात येथे दिवसा उद्यान आणि रात्री मदिरा बार असे स्वरूप येते की काय अशी भिती येथील नागरिक व्यक्त करीत आहे. संध्याकाळ नंतर जसजसा अंधार पडत जातो तसतसे मद्य शौकीन या ठिकाणी जमायला सुरूवात करतात. अडिच किमी लांब आणि शंभर फुट रूंद अशा मोकळ्या आणि चांदण्यारात्रीत ठिकठिकाणी या तळीरामांचे जथ्थे एकत्र बसून मद्य प्राशन करतात. दारू पिल्यानंतर रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, खाण्यासाठी आणलेले पदार्थ तेथे तसेच टाकून निघून जातात. याबाबत मागे स्थानिक नगरसेवक बाप्पु काटे, नाना काटे व पोलिस प्रशासण यांनाही विचारणाकरून ' सकाळ ' मध्ये या बाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. परंतु काही दिवसांपुर्ते ठिकठाक होऊन पुन्हा जैसे थी परिस्थिती या ठिकाणी अनुभवायला येते.  

स्थानिक नगरसेविका शितल काटे म्हणाल्या, " गार्डनचे काम पुर्ण झाले की येथे सुरक्षारक्षक असणार आहेत. परंतु आता काम चालु असल्याने काही अडचणी येतायेत. तरीही पोलिस प्रशासणाशी बोलुन रात्री उशीरापर्यंत येथे गस्त घालण्याकरीता सूचना मी करणार आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखुन सुज्ञ पणे वागले पाहिजे. "

सुशिक्षित आणि आयटी अभियंत्यांचे हब असलेला हा पिंपळे सौदागरचा भाग... परंतु हेच सुशिक्षित या ठिकाणी बसून विदेशी आणि मगागड्या मदिराचे पेग रिचवितात हे येथे पडलेल्या ब्रँण्डेड बाटल्यांवरून दिसते. एवढेच काय तर त्यांच्यासमवेत काही वेळा सुशिक्षित महिलाही सहभागी असल्याचे रात्री उशिरा पहायला मिळते. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अनर्थ घडू शकतो... त्यामुळे स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासणानाने ही बाब अधिक गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT