पुणे

मावळाची जीवनवाहिनी 

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - पुणे-लोणावळा लोकल ही मावळातील नोकरदारांची, गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी. मात्र, रेल्वे प्रशासनाने रात्रीच्या लोकल बंद केल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. 

मावळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आहे. पिंपरी-चिंचवड व लोणावळा परिसरातील छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये तो काम करतो. काही कामगारांना तिन्ही पाळ्यांमध्ये काम करावे लागते. रेल्वेने रात्री साडेनऊनंतर पुण्याहून; तसेच लोणावळ्याहून सुटणाऱ्या लोकल बंद केल्याने कामगारांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या पाळीत काम करणाऱ्यांना रात्रीच्या लोकलनेच प्रवास करावा लागतो. दुसरीकडे लोणावळा, तळेगाव, कान्हे, ऊर्से या औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील कामगार कामाला आहे. मूळ गावाहून परतल्यानंतर पुण्याहून येण्यासाठी त्यांना लोकल रेल्वे हाच पर्याय आहे. मात्र, रात्रीची लोकल सेवा बंद झाल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. व्यापारी, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, कामानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचीही स्वस्त व सुरक्षित सेवा म्हणून लोकलला पसंती आहे. एकप्रकारे तीच त्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकलसेवा चोवीस तास सुरू ठेवण्याची आवश्‍यकता आहे. 

दृष्टिक्षेपात लोकल
इतिहास : सुमारे ७० वर्षांचा
दररोजची प्रवासी संख्या : सुमारे १ लाख
दरमहा उत्पन्न : सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये
पूर्वीच्या लोकलचे स्वरूप : साधे
युनिट लोकल सेवा : सुमारे २५ वर्षांपासून
सात-आठ वर्षांपूर्वी लोकल डब्यांची संख्या : ९
सध्या डब्यांची संख्या : १२
प्रामुख्याने लोकलचे प्रवासी : नोकरदार, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, पर्यटक

रात्री पुण्यातून थेट निगडी अथवा तळेगावला पीएमपी मिळत नाहीत. गर्दीत जागा करीत बस बदलत कसेबसे निगडीपर्यंत पोचून, पुढे सहा आसनी रिक्षा किंवा ट्रकने सोमाटणे फाट्यापर्यंत प्रवाशांना यावे लागते. रेल्वेच्या चुकीच्या निर्णयामुळे नाइलाजाने धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो.
- सुमीत पारखे, नोकरदार

रात्री साडेनऊनंतरच्या पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करून रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासापासून वंचित केले आहे. सामान्य माणसांची ही पिळवणूक आहे.
- पोपट भेगडे, अध्यक्ष, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघ

रात्री अकराच्या सुमारास तळेगावात पोचणारी लोकल बंद केली आहे. बारा डब्यांच्या या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या नगण्य होती. या लोकलनंतर अगदी पाच मिनिटांत येणारी पॅसेंजर सर्व स्थानकांवर थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- मनोज जव्हार, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT