पुणे

Pune News : पुणं हादरलं! Dunzo मध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेवर बलात्कार; मागितली लाखोंची खंडणी

वाढत्या अत्याचारांमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत २६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली असून, बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेकडून १ लाखांची खंडणी मागितली. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरिफ खान, रवी आणि रियाज अशा ३ जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खाननने पीडितेला आपण तिच्या पतीचा मित्र असल्याचे सांगितले. तसेच Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले.

डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडितेला एक डिलिव्हरी करायची सांगत भेटण्यास बोलावले. त्यानंतर पीडितेला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत कोणाला काही सांगितले तर दुसरा आरोपी रवीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे १ लाखांची खंडणी मागितली. तर, तिसऱ्या आरोपीने पीडितेला सातत्याने धमकावल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

हा सर्व धक्कादायक प्रकार जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला असून, आरोपींच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात वरील तीन आरोपींविरोधात भारतीय दंडात्मक कलम ३७६ (२), ५०६, ३८४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT