पिंपळे गुरव : भूमिगत जलनिःसारण वाहिणी फुटल्याने मैला मिश्रित पाणी नदीपात्रात जाऊन पवना नदीचे पाणी दुषित होत आहे. 
पुणे

पवना नदीचे पात्र मैलामिश्रित पाण्याने होतेय दूषित...

मिलिंद संधान

नवी सांगवी : पवना नदीच्या पात्रात थेट मैलामिश्रित पाणी मिसळले जात असल्यामुळे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रसरकार कडून दररोज नदी सुधार योजणे संदर्भात विविध खैरातींची घोषणा होत असताना पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचे पात्र दिवसेदिवस अधिकच दुषीत होत चालले आहे. याबाबत राज्य वा महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयर सुतक नसल्याबद्दल माजी नगरसेवक जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे.    

पिंपळे गुरव मधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज फुटल्याने जवळकरनगर, वैदुवस्ती परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. असे असतानाही पिंपरी-चिंचवड याकडे कानाडोळा करीत असल्याची परिस्थिती आहे. केवळ पिंपळे गुरव पुरता हा विषय मर्यादित राहिला नाही तर नदीपात्रातील बहुतांश चेंबर हे वरून पाहिले तर सुस्थितीत दिसतात. परंतु तळाला ते फुटलेल्या स्थितित असल्याने संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दूषित पाण्याचे लोटच्या लोट नदीत सोडले जात आहेत. त्यामुळे नदीतील मासे तर केव्हाच गायब झाले आहेत. नदी काठावरील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर सारख्या उपनगरांना किंबहुणा संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराला याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. 

पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे पिंपळे गुरवमध्ये निर्माण होणारे मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. परिणामी मैलापाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र मैलापाण्यामुळे दूषित झाले. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

माजी नगरसेवक जगताप म्हणाले, "पिंपरी चिंचवड शहराच्या जीवन वाहिणीची एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा होऊन सुध्दा सत्ताधाऱ्यांबरोबर प्रशासणही मुग गिळुन गप्प बसले आहे. परिणामी साथीचे आजारांनी पिंपळे गुरवसह संपुर्ण शहरात तांडव सुरु केले आहे. त्यामुळे पालिकेने प्राधान्याने या प्रश्नाकडे लक्ष देऊन तो सोडविला पाहिजे.गेल्या काही महिन्यापूर्वीच या ड्रेनेज लाईनचे काम केले आहे. तरीही निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली. जलनिःसारण कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टुवार म्हणाले, "वीज पुरवठा खंडीत झाल्यावर पंपिंग बंद होते. त्यामुळे चेंबर तुंबल्याने काही ठिकाणी ते फुटले जातात. त्याकरीता वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून एक्सप्रेस फिडर बसविले जाणार आहे. ते काम लवकरच पुर्ण झाल्यावर हा प्रश्न राहणार नाही."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT