sanbhajiraje
sanbhajiraje 
पुणे

मराठा आरक्षण, शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर संभाजीराजेंची रोखठोक प्रतिक्रिया

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे - राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रीया दिलीये, मराठा आरक्षण हा न्यायप्रविष्ठ विषय आहे, आंदोलन करण्यापेक्षा सरकारने न्यायालयात कशी बाजू मांडावी यासाठी प्रयत्न करायला हवे, आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या जीवाला कोणताही परिणाम होण्यापेक्षा आंदोलन करत असतील तर माघार घ्यावी अशी विनंती त्यांनी केलीये. 

मराठा आरक्षण

राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत, हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, 5 फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरती सुनावणी होतीये, या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल, 5 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणं आवश्यक आहे, औरंगाबादला मी जाणार होतो, मात्र काही कारणामुळे जाता आलं नाही...आंदोलन मागे घेतलं नसेल तर मागे घ्यावं अशी मी विनंती करतोय, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

पत्नीला पैसे मागणे शोषण नाही; आत्महत्त्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा निर्णय

साताऱ्यातील एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते, तिन्ही राजे एकत्र येणार का हा प्रश्न विचारला असता, आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत, सगळ्यांची भूमिका एक आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सातारा आणि कोल्हापूर या गाद्या वेगळ्या नाहीत आम्ही एकत्रच आहोत, एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.

कोल्हापूर विमानतळ 

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांच नाव द्याव ही  आमची मागणी आहे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत छत्रपती राजाराम महाराजांच नाव द्यावं ही आमची भूमिका आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

औरंगाबाद नामांतर 

औरंगाबाद विमानतळाचा नामांतराचा विषय हा नेमका राजकारणाचा विषय आहे का काय कळतं नाही, मात्र औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करायला काय हरकतं आहे, असं म्हणत नामांतराला संभाजीराजेंनी पाठिंबा दर्शवलाय. 

दिल्लीत जे शेतकरी आंदोलन चाललंय त्यामध्ये शेतकरी हा शेतकरी असतो, त्याला इतर कोणत्या गोष्टींशी तूलना करणं चूकीचं आहे, शेतकऱ्याला त्रास होणार याची खबरदारी ही सत्ताधारी सरकारने घ्यायला हवी असं म्हणत मोदी सरकारला त्यांनी टोला लगावलाय.

विजबील 

राज्यात जे विजबीलाचा प्रश्न चाललाय त्या संदर्भात सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रीया संभाजीराजेंनी दिलीये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT