ware guruji sakal
पुणे

Pune News : वारे गुरुजी ‘अग्निपरीक्षे’त उत्तीर्ण!

वाबळेवाडी पॅटर्न निलंबन कारवाईप्रकरणी जिल्हा परिषदेचा निर्णय

भरत पचंगे

शिक्रापूर - संपूर्ण राज्यभर ‘वाबळेवाडी पॅटर्न’च्या निमित्ताने नावाजलेले, मात्र गेली दोन वर्षे शालेय कामकाजात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामात अनियमितता व निष्काळजीपणाबाबतचे आरोप ठेवलेले वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांना अखेर पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले. याबाबतचा आदेश त्यांना झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिला.

काचेची शाळा, क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय इतर १६ वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन आणि थेट स्वीडनच्या गोटलॅंड व एम. जी. स्कूल या दोन शाळांशी सामंजस्य करार करून वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा दर्जा मिळाला. मात्र, एका शाळाबाह्य व्यक्तीने प्रवेशासाठी शुल्क घेतल्याचे तोंडी आरोप १४ जुलै २०२१ केल. याबाबत तीन महिला जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत २२ नोव्हेंबर २०२१ रोजी गदारोळ केला.

त्यामुळे वारे यांचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ त्याच दिवशी निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी लावली. त्यानंतर शाळेचीही चौकशी सुरू झाली.दरम्यान, वारे यांना तालुका बदलून खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा दिली.तिथेही वारे यांनी ३ एवढा विद्यार्थी पट मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे यांच्या सोबतीने १०० पर्यंत घेऊन जात शाळेला या वर्षीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषकही मिळवून दिला.

दरम्यान, तब्बल दोन वर्षे वारे यांची विभागीय चौकशी चालू राहिल्याने हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापर्यंत गेले. तसेच, माजी मंत्री बच्चू कडू यांनीही याबाबत सरकारला वारंवार जाब विचारले. अखेर विभागीय चौकशी समितीने या संपूर्ण चौकशीत वारे यांच्यावर झालेले हलगर्जीपण, कर्तव्यात कसूर व प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह संपूर्ण आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळविले. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे यांना वरील सर्व आरोपातून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच वारे यांना समक्ष जालिंदरनगर येथे दिला.

‘सकाळ’च्या भूमिकेचा विजय : वारे

वारे यांच्यावरील आरोपानंतर ते दोषमुक्तीपर्यंतचा त्यांचा कठोर प्रवास आणि प्रत्येक घडामोडींचे वास्तव चित्र ‘सकाळ’ने सातत्याने मांडले. या काळात त्यांना अनेकांनी अनेक पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. कुणी प्रवेशाची नाराजी म्हणून, तर कुणी राजकीय कुरघोडीतून त्यांच्यावर बेछूट आरोप केले. मात्र, या प्रकरणातील सत्य सिद्ध होत नाही, तोपर्यंत ‘सकाळ’ने साथ सोडली नसल्याने हा ‘सकाळ’च्या निःस्पृह भूमिकेचा विजय असल्याची प्रतिक्रियाही वारे यांनी दिली.

निलंबन झाल्यापासून अनवाणी प्रवास

अनियमिततेचे आरोप, चौकशी, निलंबन आणि पदोपदी बदनामीला सामोरे गेलेल्या वारे यांनी निलंबन होताच पायात चप्पल घालणे सोडून दिले. हा त्यांचा त्याग वाबळेवाडीकरांनाही सहन होत नव्हता. मात्र, दोषमुक्त होताच चप्पल घालण्याबाबतचा निर्णय त्यांनी वाबळेवाडीकरांवर सोपविला असल्याची माहिती माजी सरपंच केशवराव वाबळे, सतीश वाबळे आणि सतीश कोठावळे यांनी दिली.

वारे यांच्या चौकशीचा घटनाक्रम

१४ जुलै २०२१ : तोंडी तक्रार असल्याचे सांगत गटविकास अधिकाऱ्यांची शाळेत येऊन वारे यांची चौकशी.

१६ जुलै २०२१ : शाळेची दफ्तरतपासणी न करता गंभीर अनियमितेचा अहवाल बीडीओंकडून जिल्हा परिषदेला सादर.

२७ जुलै २०२१ : जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीची स्थापना.

२९ जुलै २०२१ : शाळाबाह्य व्यक्तीचा तक्रार अर्ज जिल्हा परिषदेकडे दाखल.

९ सप्टेंबर २०२१ : चौकशी पूर्ण करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर.

२२ नोव्हेंबर २०२१ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिरूरच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांचा वारे यांच्या विरोधात गदारोळ.

२२ नोव्हेंबर २०२१ : चौकशी पूर्ण होऊनही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीत हस्तक्षेप होऊ नये म्हणून वारे यांचे निलंबन केले.

१ फेब्रुवारी २०२२ : वारे यांची जालिंदरनगर (ता. खेड) येथील शाळेत नियुक्ती.

५ सप्टेंबर २०२३ : लोकसहभागातूनच जालिंदरनगर येथे १०० विद्यार्थी पटाच्या शाळेच्या उभारणीने पुणे जिल्हा परिषदेकडून अध्यक्ष चषक जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT