पुणे : "सूर्याचा पारा वाढत असताना गरमीने शरीर घामाघूम होत आहे. यापासून दिलासा मिळाला म्हणून कुलर लावायचा प्रयत्न केला, पण तो चालूच होईना. सर्व्हिस सेंटरला फोन केला तर कोरोना लाॅकडाऊनमुळे दुरूस्तीची सर्व कामे ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बाहेर कोरोना अन् घरात उकाडा सहन होईना अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उन्हाळा सुरू झाला की घरात नवीन कुलर, फॅन घेण्याची चाहूल लागते. तसेच जुने कुलर, फॅन यांची दुरुस्ती करण्यावरही नागरिकांचा कल असतो. यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात दुकानात मोठी गर्दी असते. मात्र, यंदा कोरोना लाॅकडाऊनमुळे मार्केटच बंद असल्याने सर्व कामे बंद आहेत. पुण्यातील तापमान सध्या ३८ अंश सेल्सिअस इतके आहे, पुढील काही दिवसात ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तापमान वाढत असल्याने अनेकांनी घरात कोपऱ्यात ठेऊन दिलेले कुलर बाहेर काढले, त्यावेळी मोटर चालत नाही, पाणी पडत नाही, वाळे खराब झालेत, बटण तुटलेत अशा अवस्थेत कुलर अाहेत. फॅनचा आवाज येतोय, रेग्युलेटर खराब झाले आहेत. त्यामुळे दिवसभर घरात उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने गरमीने हाल होत आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी सर्व्हिस सेंटरला नागरिकांचे फोन वाढले आहेत
पिंपरी चिंचवडमधील आणखी दोघे पॉझिटीव्ह:एकूण आकडा 54
"कुलर दुरूस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला फोन केला होता पण लाॅकडाऊनमुळे सर्व्हिस सेंटर बंद आहेत. त्यामुळे दुकान उघडे नाही. होम सर्व्हिससाठी बाहेर पडलो तर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने सर्व्हिस सेंटर चालक दुरुस्तीसाठी नकार देत आहेत. त्यामुळे सध्या गरमीने हाल होत आहेत."
- संदीप शेटकार, ग्राहक
लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांनी आकारले ज्यादा भाडे; मग...
"कुलर, फॅन दुरुस्तीसाठी रोज किमान पाच ते सहा फोन येत आहेत. पण आम्ही दुरूस्तीसाठी जाऊ शकत नाही. पोलिसांच्या कारवाईची भिती आहेच, पण दुसऱ्याच्या घरात गेल्याने कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो."
- यासीन शेख, क्रिस्टल एंटरप्राइझेस
....तर पीएमपीएमल कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणार !
सिझन वाया जातोय
वर्षातील बारा महिन्यांपैकीमार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातच आम्हाला जास्त व्यवसाय असतो. लाॅकडाऊनमुळे सिझन वाया जाऊन मोठे नुकसान होत आहे. पुण्यातील सर्व सर्व्हिस सेंटरचालकांची हिच अवस्था आहे. कामगारही अडचणीत आहेत. नागरिकांना ही गरमीचा त्रास होत असल्याने यातून काही तरी मार्ग निघाला पाहिजे, असे गुडवील इंटरप्रायजेसचे प्रसाद घोरपडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.