Sand_Mafia 
पुणे

कोट्यवधीच्या वाळू बोटी उडवल्या; भिगवणला पोलिसांची धडक कारवाई

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमांचा फायदा घेत डिकसळ (ता.इंदापूर) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर शनिवारी (ता.१३) पहाटे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिसांनी शनिवारी (ता.१३) पहाटे डिकसळ पूलाजवळ मोठी कारवाई केली. कारवाईमध्ये एक कोटी दोन लाख रुपयांच्या बोटी स्फोटकांच्या सहाय्याने फोडण्यात आल्या, तर २० जणांवर गुन्हे दाखल करून त्यापैकी सतरा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईने तिन्ही जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले.

पुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध वाळू माफियांविरुद्ध जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू होता. याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांना माहिती मिळताच शनिवारी (ता.१३) पहाटे तीनच्या सुमारास पोलिस पथकांसह घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी फायबर बोटींच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. वाळू माफियांना पोलिसांची चाहूल लागताच पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी सिपू नुरुलहक्क शेख (वय ३०), मोहम्मद नईम, जलालुद्दीन अख्तर (वय २३), जहीर शहाजहान शेख (वय ३०), साहिब पेशकर शेख (वय ३२ ), मोहम्मदहुसेन अहमद हुसेन शेख (वय ३०), मुश्राफ कादर शेख (वय २९), इस्माईल इन्साराली शेख (वय ३६), अन्सूर इनामुल शेख (वय २८), सोहिदुल एहसिन शेख (वय २५), अरुण जोशरअली रशीद (वय ३४), फिटलू अबुल शेख (वय ३२), सारिफ सादिक शेख (वय ३०), नुरआलम कुदरत शेख (वय ३०), महिबूब शेख (वय २०), शहुबुत अज्जुल शेख (वय ३३), समीम सायद शेख (वय ३०), कौसर मन्सूर शेख (वय २३, सर्व मूळचे झारखंड) आणि बोट मालक मधू गोडसे, बाबू मोरे (रा. दोघे शिरपूर, ता. दौंड), गणेश यादव (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) या वीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यापैकी सतरा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या चार फायबर आणि दोन हायड्रोलिक बोटी तसेच ७० ब्रास वाळू असा एकूण एक कोटी २ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भादवि कलम ४३९ शासकीय जलजागेतून चोरी, ४११ माहिती असून शासकीय मालमत्तेची चोरी, पर्यावरण अधिनियम कलम ९ आणि १५ सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण आणि गौण खनिज कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकातील पोलीस हवालदार दतात्रय खुटाळे, इन्क्लाब पठाण, समीर करे, दतात्रय जाधव, शंकर निंबाळकर, अप्पासाहेब भांडवलकर, संजय काळभोर, शंकर वाघमारे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी वाळू माफियांविरुद्ध केलेल्या या कारवाईचे पंचक्रोशीतून स्वागत होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

SCROLL FOR NEXT