Pune Police parading the arrested cousins in Katraj after they vandalized multiple vehicles and attempted to flee.

 

esakal

पुणे

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Pune Police action on Katraj crime : जिथे गाड्या फोडल्या, तिथेच नागरिकांसमक्ष पोलिसांनी काढली मावस भावांची "वरात"

Mayur Ratnaparkhe

Pune Police Action after vehicle vandalism in Katraj : पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून पसार झालेल्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी या सगळ्या टोळक्याला घेऊन पंचनामा करण्यासाठी त्यांची  त्याच परिसरातून धिंड देखील काढली.

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अंदाजे 2 वाजता सच्चाई माता मंदिर, कात्रज परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा व टेम्पोची धारदार हत्याराने तोडफोड करण्यात आली होती.

या प्रकरणी नितेश नितीन सवने आणि अजय नामदेव खंडागळे या दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मावसभाऊ असून किरकोळ भांडणाच्या कारणावरून या आरोपींनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान केले होते. यानंतर हे दोघेही पसार झाले होते.

पुणे पोलिसांच्या या कारवाईवर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांच्या अशा कारवाईमुळे टवाळखोरांवर चांगला जरब बसेल, अशी भावना व्यक्त होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशास पकडून भरवस्तीत बेदम चोप दिला होता.

याचबरोबर यावेळी नागरिकांनी अशा गुन्हेगारी घटनांमुळे घाबरून न जाता, थेट पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. असे आवाहन करत पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा वैयक्तिक मोबाइल नंबरही नागरिकांना जाहीरपणे सांगितला होता. एकूणच पुण्यातील दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस चांगलेच कारवाईत आल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय- पॉपस्टार, इतक्या लाखांचं मिळालं बक्षीस

Mumbai News: घरांच्या मालमत्ता करमाफीचा आर्थिक फटका, पाणीपट्टीही बंद; महापालिकेला २०० कोटींचा तोटा!

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Latest Marathi News Live Update: मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात झालेली आहे - विजय वडेट्टीवार

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

SCROLL FOR NEXT